Disha Shakti

राजकीय

पराभव दिसू लागल्याने विखेंनी उभा केला `डमी निलेश लंके ‘ महाविकास आघाडीचा आरोप; विखेंच्या डमी कारभाराची केली पोलखोल

Spread the love

विशेष प्रतिनिधी / वसंत रांधवण : महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांच्या पुढे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी निवडणूकीत मोठे आव्हान उभे केल्याने विखेंच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. कदाचित पराभव समोर दिसू लागल्याने विखेंनी आता नेहमीप्रमाणे डमीची खेळी सुरू केली असून दुसरा निलेश लंके उभा केला असल्याचा आरोप महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांच्या जिल्हाध्यक्षांनी आज शुक्रवार( दि.२६) पत्रकार परिषदेत करत विखेंच्या डमी कारभाराची पोलखोल केली.

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी निलेश साहेबराव लंके नावाने दाखल झालेल्या अर्जाची पोलखोल महाविकास आघाडीने नगर राष्ट्रवादी भवन येथे आयोजित पत्रकार परिषद घेऊन केली आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, काँग्रेसचे शहराध्यक्ष किरण काळे,आम आदमी पक्षाचे सुभाष कोकाण, उद्धव दुसुंगे, संपतराव म्हस्के, दशरथ शिंदे, विलास उबाळे आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना या पदाधिकार्यांनी सांगितले की,महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश ज्ञानदेव लंके यांची वाढती लोकप्रियता भाजपा उमेदवार सुजय विखे यांची भीती वाढवणारी आहे. सुजय विखे यांचे नोटरी त्यांच्यासाठी स्टॅम्प घेणारा व्यक्ती हा उभा केलेला डमी उमेदवार निलेश साहेबराव लंके यांच्यासाठी देखील स्टॅम्प घेतो हा योगायोग की नियोजित प्रकार आहे ? ५० वर्षे विखे कुटुंबाने डमी कारभार केला. सुजय विखे यांची डिग्री देखील कशी आहे. ? याबाबत त्यांचे काका अशोक विखे यांनीच सांगितले आहे. संपत्तीसाठी डमी भाऊ कुणी उभा केला व तलाठी भरती मध्ये डमी कारभार झाला हे सर्वज्ञात आहे.

 शासकीय यंत्रणेचा केला गैरवापर

५० वर्षांची सत्ता असणारे विखे कुटुंब यांनी सामान्य कुटुंबातील निलेश लंके यांची धास्ती घेणे यातच सर्व काही सामावले आहे. निलेश साहेबराव लंके हा कामोठे येथिल व्यक्ती जानेवारी पर्यंत निघोजच्या मतदार यादीत नसताना देखील अचानक दोन नावे मतदार येतात. यासाठी शासकीय यंत्रणा किती तत्पर आहे. असा उपरोधिक टोला या पदाधिकाऱ्यांनी लगावला. डमी उमेदवार उभा करणे हे पराभवाची मानसिकता समोर आणणारे आहे. शरद पवार यांनी नगर येथील सभेत एक गौप्यस्फोट केला. त्यात विखे यांनी पंधरा दिवस अगोदर आपल्याकडे एक उद्योगपती पाठवून निलेश लंके यांना उमेदवारी देऊ नका दुसरे कुणीही द्या असे सांगितले होते. याचा अर्थ विखे घाबरलेले आहेत.

आमच्याकडेही सुजय विखे नावाचे २ जण होते

नावात साधर्म्य असणाऱ्या माणसाचा वापर करून शेवटी पाठिंबा देऊन घेणे, डमी नावाने बातम्या देणे, आरोप करणे,अशा डमी उमेदवाराचा गैरवापर करणे अशी हतबलता विखे यांची दिसते आहे. आमच्याकडे देखील सुजय विखे नावाने दोन उमेदवार संपर्कात होते, मात्र आम्ही अर्ज दाखल केले नाही. जर विजयाची खात्री असेल तर नावाचे साधर्म्य असणारे उमेदवार दाखल करण्याची गरज नाही. विखेंना पराभव दिसत असल्यामुळे कदाचित असा प्रकार त्यांनी केला असावा असा आरोप महाविकास आघाडीच्या वतीने केला गेला आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!