विशेष प्रतिनिधी / वसंत रांधवण : शेतकरी व कष्टकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना भूमिपुत्र शेतकरी संघटना या संघटनेच्या माध्यमातून अनेक प्रश्न व समस्या सर्वसामान्य जनतेच्या आजपर्यंत मार्गी लागल्या आहेत. संघटनेची राजकीय भूमिका स्पष्ट करण्यासाठी मंगळवार दि. ३० एप्रिल रोजी अहमदनगर या ठिकाणी जिल्हा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष वाडेकर यांनी दिली.
राज्यात ठीक ठिकाणी व अहमदनगर जिल्ह्यात भूमिपुत्र शेतकरी संघटनेची मोठी ताकद आहे. आंदोलनात्मक भूमिकेच्या माध्यमातून नेहमीच सकारात्मक लढाई लढणारी संघटना म्हणून भूमिपुत्र शेतकरी संघटनेला संपूर्ण राज्यात ओळखले जाते.
सध्या देशात लोकसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. शिर्डी लोकसभा मतदार संघामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून भाऊसाहेब वाकचौरे विरुद्ध शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून सदाशिव लोखंडे तसेच नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पार्टीचे डॉ. सुजय विखे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे निलेश लंके लोकसभेच्या रिंगणात एकमेकांसमोर उभे आहेत.या निवडणुकीत कोणासोबत जायचे कोणाला पाठिंबा द्यायचा कोण सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणार या संदर्भात चर्चा विनिमय करण्यासाठी आणि आपली राजकीय भूमिका स्पष्ट करण्यासाठी भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हा बैठकीचे आयोजन अहमदनगर या ठिकाणी करण्यात आले आहे या बैठकीमध्ये संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत विचारविनिमय करून व त्यांच्या मताशी सहमती घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष वाडेकर यांनी दिली आहे.
भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संतोष वाडेकर मंगळवारी राजकीय भूमिका स्पष्ट करणार, भूमिपुत्र शेतकरी संघटनेची ३० एप्रिलला जिल्हा बैठक

0Share
Leave a reply