Disha Shakti

राजकीय

विखे यांच्या पन्नास वर्षाच्या यंत्रणेला निलेश लंके यांच्याकडून धक्का ! डमी नीलेश लंके यांच्यासह वंचित बहुजन आघाडी, एम आय एम च्या उमेदवारांची माघार

Spread the love

जिल्हा प्रतिनिधी / वसंत रांधवण : नीलेश लंके यांना घेरण्यासाठी डमी निलेश लंके या उमेदवारासह एम आय एम, वंचित बहुजन आघाडी आदी उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात करण्याची खेळी करणाऱ्या सुजय विखे यांना आमदार निलेश लंके यांनी धोबीपछाड दिली आहे.

गेल्या पन्नास वर्षापासून विखे यांची यंत्रणा वेगवेगळ्या क्लुप्त्या लढऊन समोरच्या उमेदवारास नामोहरम करीत असे. या निवडणुकीतही तसेच झाले. मात्र विखे यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार नीलेश लंके यांनी विखे यांचा क्लीन बोल्ड करीत त्यांच्या डावपेचाना परतून लावण्यात यश मिळविल्याचे अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी स्पष्ट झाले. निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी व सुरू झाल्यानंतर विखे यांनी लंके यांना बॅक फूटवर आणण्याचा बरेच वेळा प्रयत्न केला, मात्र वेळोवेळी खा. विखे हेच ट्रोल झाल्याचे पहावयास मिळाले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!