Disha Shakti

क्राईम

सिगारेटची बॅग चोरी करणारे ०२ आरोपी पुणे येथुन ४८,४००/- रुपये किमतीचे मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात

Spread the love

विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : प्रस्तुत बातमीची हकीगत अशी की, तक्रारदार श्री मिराज मुमताज शेख रा. मुकुंदनगर, अहमदनगर हे गोडफ्रे फिलीप्स इंडिया लिमिटेल या कंपनीमध्ये सेल्समन म्हणून काम करत असुन त्यांनी दिनांक २२/०४/२०२४ रोजी अहमदनगर येथुन सुपा परिसरामध्ये सिगारेट विक्रीकरीता गेले होते. तक्रारदार यांनी त्यांचेकडे असलेली सिगारेटची बॅग मोपेड मोटारसायकलवर ठेवून सुपा येथील साई श्रध्दा किराणा स्टोअर्स या दुकानामध्ये गेले असता कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी १,०९,७०४/- रुपये किमतीचे सिगारेट व रोख रक्कम असलेली बॅग चोरुन नेली होती. सदर घटनेबाबत सुपा पोलीस ठाणे गु.र.नं. १९३/२०२४ भादवि कलम ३७९, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

मा. श्री राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी मालाविरुध्दचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत श्री दिनेश आहेर पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना आदेश दिले आहेत. नमुद आदेशान्वये पोनि श्री दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि/तुषार धाकराव, पोलीस अंमलदार भाऊसाहेब काळे, दत्तात्रय हिंगडे, मनोहर गोसावी, रविंद्र कर्डीले, अमृत आढाव, सागर ससाणे, फुरकान शेख, मेघराज कोल्हे, संतोष खैरे, संभाजी कोतकर यांचे पथक तयार करुन पथकास गुन्हा उघडकीस आणणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले होते.वरील पोलीस पथकाने सुपा परिसरामध्ये जावुन घटनाठिकाणीचे तसेच घटनाठिकाणचे आजुबाजुचे परिसरातील फुटेजची पाहणी केली असता पथकास ४ इसम सिगारेटचे बॉक्स असलेली बंग पुणेकडे जातांना दिसले.

सदर फुटेजमधील संशयीत इसमांची माहिती घेत असतांना फुटेजमधील एक इसम हा आकाश भवरसिंह राजपुत रा. पुणे असल्याचे निष्पन्न झाले. सदर आरोपीची माहिती काढत असतांना तो त्याचे साथीदासह त्यांचे राहते घरी आला असल्याची माहिती प्राप्त झाल्याने पथकाने दिनांक २७/०४/२०२४ रोजी पुणे येथे जावुन आरोपी नामे १) आकाश उर्फ बंटी भवरसिंह राजपुत वय – २१ वर्षे, रा. विद्यानगर झोपडपट्टी मस्जिदजवळ, पिंपरी पुणे, २) रोहित मदन कुर्मी वय २४ वर्षे, रा. सदर यांना ताब्यात घेतले. त्यांचेकडे सदर गुन्ह्याबाबत विचारपुस करता त्यांनी ३) विशाल उर्फ बारक्या अनिल नलवडे रा. रामनगर, पिंपरी चिंचवड पुणे, (फरार), ४) रोहित छोटु भोसले रा. रामनगर, पिंपरी, चिंचवड पुणे (फरार) यांचेसोबत गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.

ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीकडुन ८०००/- रुपये रोख रक्कम व ४०,४००/- रुपये किमतीचे सिगारेटचे बॉक्स, बॅग असा एकुण ४८,४००/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ताब्यातील आरोपींना पुढील तपासकामी सुपा पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले असुन पुढील तपास सुपा पोलीस ठाणे करीत आहे.

सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साो. पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्री. प्रशांत खैरे साहेब, अपर पोलीस अधीक्षक अहमदनगर, श्री संपत भोसले साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर ग्रामीण उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!