Disha Shakti

इतर

दौंड तालुक्यातील खानवटे गावचा बस थांबा फक्त नावापुरताच का? प्रवाशांचा सवाल

Spread the love

दौंड तालुका प्रतिनिधी / सुधीर लोखंडे : खानवटे तालुका दौंड या ठिकाणी खानावटेगावच्या वेशी वरती विनंती थांबा बसवण्यात आलेला आहे परंतु खानवटे ग्रामपंचायतीने एसटी विनंती थांबा या बोर्डची उंची चार ते पाच फूट एवढ्या कमी उंचीचा केल्यामुळे एसटी चालकाला विनंती थांब्याचा फलक न दिसल्यामुळे एसटी चालक बस थांबवत नाही, फलक बसवण्याचा उद्देश वृद्ध, दिव्यांग इत्यादी लोकांची सोय होऊन एसटी थांबेल या उद्देशाने लावण्यात आला होता परंतु फलकाची उंची कमी असल्यामुळे एसटी चालकांना विनंती थांबा हा फलक दिसत नाही असे एसटी चालक म्हणतात, यामध्ये रडक्याचे डोळे पुसण्याचे काम केले आहे असे वयोवृद्ध ,दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांचे मत आहे तरी खानवटे ग्रामपंचायत ने एसटी विना थांबा फलक दिसेन असा व सुस्पष्ट अक्षरात लावावा ही विनंती.

ज्येष्ठ नागरिक ,वयोवृद्ध व दिव्यांग व इतर लोकांचे सोय व्हावी म्हणून एसटी विनंती थांबा हा फलक लावण्यात यावा असा अर्ज ग्रामपंचायत खानवटे २९/८/२०२२ च्या ग्रामसभेत रामलिंग शिवलिंग कोरे प्रहार संघटना अध्यक्ष खानावटे व श्री शहाजी गुलाब भोसले उपाध्यक्ष यांनी ग्रामसभेमध्ये ठराव झालेल्या प्रती बारामती आगार व करमाळा आगार या ठिकाणी दिल्या होत्या त्याची पोचपावती सुद्धा त्यांच्याकडे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!