महाराष्ट्र दिन 1 मे
लढवय्या मनगटांचा इथे
इतिहास आहे धाक
आपल्या मायभूमीप्रति
मनात अभिमान राखशिवरायांचा पदस्पर्शाचा
गंध तिच्या कपाळी
वारसा संस्कृतीचा जपती
पहाटेची ती भूपाळीजात्यावरच्या ओव्यांचा
इथे अमृताचा स्वाद
ना केला कुणी ना करू नये
मराठी अस्मितेचा नादशेतकऱ्यांच्या पाठीवर जरी
अस्मानी संकटाचे वळ
कष्टकरी हातांना इथे
बारा हत्तीचे बळसमाज सुधारणेचा त्यांनी
घेतला होता वसा
म्हणून महाराष्ट्र माझा
आज घडला हा असालावणीच्या ठेक्यावर इथे
थिरकतात कळावंतांची पावले
विश्व गोरगरिबांचे माझ्या
महाराष्ट्र कुशीत सामावलेलढवय्या शहीद विरांचे
रक्त सांडले या मातीत
अजूनही धस्स्स होते
त्या दुष्मनांच्या छातीतहिमालयच्या रक्षणाला
तो सह्याद्रीही गेला धावून
धन्य व्हावा जन्म माझा
पायधूळ इथली लावूनबलिदानी विरांची माझ्या
भूमिस आहे परंपरा
मराठी माझी भाषा अन
महाराष्ट्र धर्म खरापोलीस उपनिरीक्षक
अजय दत्तात्रय चव्हाण
खाकी वर्दीतील दर्दी कवी
मो. 8424043233
Leave a reply