मुंबई कांदिवली प्रतिनिधी / भारत कवितके : कांदिवली पश्चिम येथील लोकनेते गोपीनाथ मुंडे चौक, सह्याद्री नगर कांदिवली पश्चिम या ठिकाणी संकल्प सिध्दी चेरिटेबल ट्रस्टचे संस्थापक बाळा तावडे यांच्या वतीने एक मे महाराष्ट्र दिन,व कामगार दिन मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन व आरती करण्यात आली. त्यानंतर स्फूर्तिदायक महाराष्ट्र गीत सामुहिक पणे गायले.तेथे छत्रपती शिवाजी महाराज यांची मोठी प्रतिमा ठेवण्यात आली होती.त्या भोवती विद्युत रोषणाई व आरास करण्यात आली होती.यावेळी ट्रस्ट चे संस्थापक बाळा तावडे व प्रमुख पाहुणे कमलेश यादव यांनी जमलेल्या महाराष्ट्र प्रेमींना मार्गदर्शन केले तर आणि ट्रस्ट च्या वतीने कांदिवली विभागातील साफसफाई कामगार यांचे कामगार दिनाच्या निमित्ताने सत्कार करण्यात आले.
यावेळी या विभागातील जेष्ठ पत्रकार साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते भारत कवितके यांनी आपल्या भाषणात सांगितले की,” पोवाडा, लावणी, अभंग, लोकधारा, भावगीते, यातून आपल्याला महाराष्ट्र राज्याची खरी ओळख व खरा इतिहास डोळ्यासमोर येतो, हा महाराष्ट्र शिवबा, तुकोबा, ज्ञानोबा, शूरांनी,विरांनी, कष्टकरी कामगार शेतकरी श्रमिक, पवित्र नद्यांनी, डोंगर पर्वतांनी समृद्ध केला आहे.” या प्रसंगी बाळा तावडे, कमलेश यादव, वर्मा, पडवळ, सिंह, भारत कवितके, रेश्मा टक्के, सिमा राणे,रुपाली चाळके, संतोष जाधव, प्रविण पाल, गुलाब मोर्या,हरिशंकर गिरी, हेमंतकुमार शर्मा, सिताराम विश्वकर्मा,सह विभागातील इतर पुरुष व महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.
Leave a reply