श्रीरामपूर विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : शिर्डी लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांकरिता मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री नेत्यांच्या सभा होत असतांना वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षाताई रुपवते यांच्या प्रचारार्थ आज श्रीरामपूर येथील मिनी स्टेडियम याठिकाणी ॲड. प्रकाश आंबेडकर यांची भव्य संविधान निर्धार सभा संपन्न झाली.
यावेळी उपस्थित जनसमुदायास ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी संबोधित करत देशाला आणि संविधानाला वाचवायचे असेल तर शिर्डी लोकसभा मतदार संघातील सर्व समाजाने उत्कर्षाताई रुपवते यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून प्रेशर कुकर या चिन्ह समोरील बटन दाबून विजयी करावे असे आवाहन केले आहे.
या सभेसाठी वीस ते तीस हजार जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता त्यामुळे या जनसमुदायातून असे चित्र पाहायला मिळते की महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही उमेदवारांचा उत्कर्षाताई नक्कीच पराभव करतील आणि जनता या दोन्ही उमेदवारांना कंटाळले आहे जनतेचे म्हणणे आहे की हे दोन्ही उमेदवार या पक्षातून त्या पक्षात जात आहे जर आपण तिसरे उमेदवार म्हणजे वंचित बहुजन आघाडीच्या उत्कर्षा ताई रूपवते यांना निवडून दिले तर एक महिला असल्यामुळे नक्कीच आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा विकास होईल असे जनमत मानले जात आहे.
बहुजन समाजाच्या नेत्या उत्कर्षाताई रुपवते यांच्या प्रचारार्थ ॲड. प्रकाश आंबेडकर यांची श्रीरामपूरमध्ये संविधान निर्धार सभा संपन्न

0Share
Leave a reply