राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : प्रस्तुत घटना अशी की दिनांक 6/05/2024 रोजी दुपारी पोलीस निरीक्षक श्री ठेंगे साहेब यांना गुप्त बातमी दारामार्फत बातमी मिळाली की, राहुरी शहरात अवैधरित्या वाहनांमध्ये दारूची चोरटी वाहतूक होत आहे अशी बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक श्री ठेंगे साहेब यांनी तात्काळ पथक तयार करून राहुरी शहरांमध्ये पाठवून वाहनांमध्ये अवैधरित्या दारूची चोरटी वाहतूक करणाऱ्या वाहनांचा शोध घेऊन खात्री करून कारवाई करणे बाबत सूचना दिल्याने पथकाने बातमीच्या ठिकाणी सापळा लावून राहुरी शहरांमध्ये एक स्विफ्ट क्र. एम एच 05 ए जे 7388 या वाहनांमध्ये इसम नामे 1) शामवेल अनिल साठे वय 23 वर्ष रा. राहुरी खुर्द ता.राहुरी जिल्हा अहमदनगर हा दारूची चोरटी वाहतूक करताना मिळून आल्याने त्यांच्यावर राहुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्यांच्याकडून एकूण 7,170 ₹ किमतीची देशी विदेशी दारू व 2,07,170 रु. किमतीची स्विफ्ट क्र. एम एच 05 ए जे 7388 या मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे
सदरची कारवाई मा.श्री.राकेश ओला सो. पोलीस अधीक्षक अहमदनगर, मा.श्री.वैभव कलुबर्मे सो.अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर जि.अहमदनगर, श्री.डॉ.बसवराज शिवपुजे सो. उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर उपविभाग जि.अहमदनगर यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पो.नि.संजय आर.ठेंगे यांचे नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे, पोलीस , सहाय्यक फौजदार गीते,पोलीस हेडकॉन्स्टेबल सुरज गायकवाड,राहुल यादव , अशोक शिंदे,विकास वैराळ, प्रमोद ढाकणे, , सतीश कुराडे, सचिन ताजने, आदिनाथ पाखरे ,दादासाहेब रोहकले नेमणुक राहुरी पोलीस स्टेशन जि.अहमदनगर यांनी केलेली आहे.
Leave a reply