जिल्हा प्रतिनिधी/ वसंत रांधवण : विधानसभेचे माजी उपाध्यक्ष, माजी आमदार विजय औटी यांनी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना पाठिंबा जाहीर केल्यानंतर पाठिंब्याविषयी सविस्तर भुमिका कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात औटी हे मांडणार आहेत. पारनेर शहरातील मनकर्णिका सभागृहात बुधवार (ता.८) रोजी सकाळी १० वाजता औटी समर्थकांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहीती रामदास भोसले, शंकर नगरे, निलेश खोडदे, सुरेश बोरुडे, सुभाष ठाणगे, शुभम देशमुख, जयसिंग धोत्रे, पंढरीनाथ उंडे, नवनाथ सोबले, बाबासाहेब न-हे, कांतीलाल ठाणगे, सुनिता मुळे यांनी दिली.
लोकसभा निवडणुकीत पारनेर-नगर मतदारसंघात माजी आमदार विजय औटी यांची भुमिका महत्वाची ठरणार आहे. सलग पंधरा वर्षे त्यांनी पारनेर नगर मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. कार्यकर्त्यांचा संच मोठा आहे. जिल्ह्यातील अभ्यासु नेते अशी त्यांची ओळख आहे. मतदारसंघ फेररचनेत त्यांनी अभ्यासपूर्ण बाजु मांडली होती.
दिनांक १ मे रोजी त्यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. पाठिंबा जाहीर केल्यानंतर त्यांनी सविस्तर भुमिका मांडली नव्हती. याकरता औटी समर्थकांनी तालुक्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला असुन त्याची जय्यत तयारी सुरु केली आहे. या मेळाव्यात खासदार सुजय विखे यांना का पाठिंबा देण्यात आला याविषयी व तालुक्यातील इतर राजकीय परिस्थितीतीवर माजी आमदार औटी बोलणार आहेत. ते काय बोलता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पारनेरला 8 मे रोजी विखेंच्या पाठिंब्यासाठी विजय औटींचा मेळावा, विजय औटींच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष

0Share
Leave a reply