बिलोली प्रतिनिधी / साईनाथ गुडमलवार (कासराळीकर) : कानिफनाथ वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची द्वारा आयोजित भव्य बालसंस्कार ज्ञानदान शिबिर आधारलिंग मल्लिनाथआश्रम दगडापूर ता.बिलोली येथे युवा कीर्तनकार हरिभक्त पारायण नितीन महाराज नरेवाड भोसीकर माजी विद्यार्थी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची यांच्या आयोजनातून बालसंस्कार ज्ञानदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सदरील शिबिराचे उद्घाटन जिल्हा सरचिटणीस तथा जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मणराव ठक्करवाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती भाजपा तालुका चंद्रशेखर पाटील सावळीकर, शंकराव गंगुलवार, शंकरराव दोनकोंटे,माधव पाटील इंद्राक्षे, हनमंत पाटील इंद्राक्षे, त्र्यंबक महाराज पाठक, लक्ष्मण जमदडे, गुरु इंद्राक्षे, दिगंबर शेळके, परमेश्वर टोम्पे, राजु गुरूंदे आधी उपस्थित होते. बालसंस्कार शिबिर 22 दिवस चालणार असून आज पर्यंत पन्नास विद्यार्थ्यांची नोंद झालेली आहे.
या शिबिरामध्ये स्वावलंबी जीवन, योगासने प्राणायाम, शूरवीरांचा इतिहास,श्रीमद् भागवत कथा, हनुमान चालीसा,हरिपाठ वारकरी भजन, पंखवाज,संत चरित्र, विविध खेळ इत्यादी माहिती या शिबिराच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. तरी शिबिरामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आव्हान युवा कीर्तनकार हरिभक्त परायण नितीन महाराज भोसीकर यांनी केले आहे.
Leave a reply