Disha Shakti

इतर

वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे वीजपुरवठा खंडित, अक्षरशा ग्रामस्थांनी रात्र जागुन काठली

Spread the love

बिलोली प्रतिनिधी / साईनाथ गुडमलवार  (कासराळीकर ) : वातावरणातील बदल व तीव्र उन्हानंतर शुक्रवारी सायंकाळी सहा च्या सुमारास बिलोली तालुक्यासह परिसरात मेघगर्जनेसह वादळी पाऊस झाला त्यामुळे तालुक्यातील कासराळी,भोसी, बेळकोणी बु, कोल्हेबोरगाव, तळणी, पाचपिंपळी, रामपुर,सगरोळीसह इतर गावांमध्ये अनेक घरावरील पत्रे उडाली वादळी वाऱ्यामुळे वीज वितरण चे तारे तुटले इलेक्ट्रिक पोल जमिनीतून उकडून पडणे आहेत. झाडे पडून सिमेंटचे पोल जमिनीवर कोसळे आहेत तांत्रिक बिघाड झाली आहे.

तसेच शंकर नगरहून ते 33 के वि कासराळी उपकेंद्राला येणारी मेन लाईन जोराच्या हवा पाणी आणि अवकाळी वादळी वाऱ्यामुळे झुकून पोल पडलेले आहेत. त्यामुळे गावामध्ये वीजपुरवठा खंडित होता. अक्षरशा ग्रामस्थांनी रात्र जागुन काठली. अशा प्रसंगी वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी युध्द पातळीवर काम करत आहेत तरी जनतेने सहकार्य करावे असे आव्हान महावितरण कडून करण्यात आले आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!