राहाता प्रतिनिधी / विट्ठल ठोंबरे : आज अक्षय तृतीया बोली भाषेत आखिती. मला हेच नाव खूप आवडते कारण आख्खी तिज हे या शब्दाचं मूळ. आख्खी म्हणजे अखंड जी कधी सरत नाही ती. मनुष्याला हे कायम सगळ्या चांगल्या गोष्टी अखंड हव्या असतात. या दिवशी सर्व जण नवीन गाडी, वस्तू, सोने असे नवनवीन खरेदी करतात. ज्या अखंड स्वरूपाने हव्या असतात. म्हणूनच या दिवशी तीजेला महत्व आहे. खरतर ही तृतीया जशी देवांची तशीच पितरांची त्याहून अधिक सर्वांच्या तृप्तीची. वैशाख वणव्यात पोळणाऱ्या प्रत्येकाला शांत करण्यासाठी. आजच्या दिवशी महत्व असतं ते थंडावा देणाऱ्या वस्तूंच्या दानाचं त्याच बरोबर शेतकरी बांधवांसाठी पहिल्या पेरणीचं ही पेरणी शेतातली नाही तर परसातल्या भाजीपाल्याची. आळ्यातल्या वेलांची आणि काशिविश्वेवर महादेवाच्या मंदिरातील भरगोज रंगबेरंगी, गुलालानी माखलेली, आनंदाने भरलेली, महादेवाच्या आशीर्वादाने, भक्तांच्या प्रेमाने, स्नेह, उत्साहाने आज काठी मिरवणूक काढली जाते. ही काठी महादेवाच्या दर्शनानंतर गावात मिरवणूक काढली जाते. नांदूर गावात विद्युत रोषणाई, पाळणे, बरोबर भाविक भक्त यांच्या आनंदाने खूप सजली होती. अक्षय तृतीया निमित्त नांदूर गावात खूप मोठ्या उत्सहाने महादेव यात्रा साजरी करण्यात आली.
श्री काशी विश्वेश्वर महादेव मंदिर उत्सवानिमित्त विद्युत रोषणाई व काठी मिरवणूक उत्साहात साजरी…

0Share
Leave a reply