नांदेड जिल्हा प्रतिनिधी /मिलींद बच्छाव: नुकतेच नांदेड MIDC मधील टेक्सकॉम कॉर्पोरेशन ऑफ मराठवाडा लि. ही कंपनी अनेक वर्षापासून बंद अवस्थेत आहे.या कंपनीला जी जागा दिली होती त्या जागेचा उपयोग हे सिमेंट, खत साठवणुकीच्या गोदामासाठी करत होते.टेस्ककॉम कॉर्पोरेशन ऑफ मराठवाडा प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आज चालू असती तर हजारो युवा सीनियर सिटीजन यांना या कंपनीमध्ये रोजगार मिळाला असता. पण फक्त जागा कब्जात ठेवण्यासाठी यांनी या कंपनीची नोंदणी करून ठेवली आहे.
या ठिकाणी अनेक छोटी उद्योग सुरू होऊ शकतात त्यातून अनेक तरुणांना रोजगार मिळू शकतो या भावनेने गजानन पाटील तमलुरे शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहरप्रमुख नायगाव (बा.) यांनी मओविम मुंबई,यांना तक्रार दिली होती त्यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने या कंपनीला नोटीस आली आहे की 9 महिन्यात कंपनी सुरू करा अन्यथा जागा परत करा..या कंपनीमुळे हजारो तरुण रोजगारापासून वंचित झालेले आहेत.असेच अनेक कंपन्या आहेत कृष्णुर एमआयडीसी मधील अनेक कंपन्या विरोधात रोजगरनिर्मिती साठी आवाज उठवणार असे शिवसेनेचे गजानन पा. तमलुरे यांनी सांगितले आहे….
Leave a reply