इंदापूर प्रतिनिधी / सुधीर लोखंडे (१२मे) : रोजच्या धकाधकीच्या जीवनात क्षणभर कुटुंबासह पर्यटन स्थळा ना भेटी देण्यासाठी घरातील अबाल बुद्धांचे थंड हवेच्या ठिकाणी तुफान गर्दी पाहावयास मिळत आहे, सह कुटुंब, सहपरिवार, धार्मिक स्थळांना व थंड हवेच्या ठिकाणी भेटी देत आहेत. यामध्ये राज्यातील, पर राज्यातील देशांतील ,परदेशातील लोक जीवनातील मनसोक्त , मन मुराद आनंद लुटत आहेत, उन्हाळ्याच्या बालगोपाळांना सुट्टी असल्यामुळे कुटुंब सहलीचे नियोजन करत आहे, यामध्ये धार्मिक ठिकाणे, नरसोबाची वाडी, आदमापूर, ज्योतिबा मंदिर, कोल्हापूर, कनेरी मठ, रंकाळा तलाव, मारलेश्वर व गणपतीपुळे या धार्मिक स्थळांना व थंड हवेच्या ठिकाणाला लोक भेटी देत आहेत. व जीवनातील मनसूक्त आनंद घेताय. जीवन म्हणजे पाण्याचा बुडबुडा, आळू वरचा थेंब कधी गळून पडेल सांगता येत नाही, म्हणून जीवनाचा मनसोक्त आनंद घ्या, अशी प्रतिक्रिया तेथील काही पर्यटकांनी दिले.
Leave a reply