Disha Shakti

कविताराजकीय

अखिल भारतीय मराठा महासंघाचा निलेश लंकेंना बिनशर्त पाठिंबा

Spread the love

पारनेर प्रतिनिधी / गंगासागर पोकळे : सद्या देशात लोकसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे निलेश लंके विरुद्ध भाजपचे सुजय विखे यांच्यात थेट काटे की टक्कर होत आहे. सर्वसामान्यांचा उमेदवार म्हणून निलेश लंके यांना नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात मोठा पाठिंबा मिळत आहे. अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष बिभीषण खोसे पाटील यांनी निलेश लंके यांना बिनशर्थ पाठिंबा जाहीर केला आहे. उमेदवार निलेश लंके यांची नुकतीच पदाधिकाऱ्यांसमवेत भेट घेऊन त्यांनी पाठिंब्याची पत्र त्यांना दिले आहे.

यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष बिबीशन खोसे पाटील यांच्या समवेत शेतकरी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष गंगाधर बोरुडे, राहुरी तालुकाध्यक्ष सुनिल निमसे, पारनेर तालुकाध्यक्ष सोमवंशी, युवक जिल्हाध्यक्ष अनिकेत कराळे, कर्जत तालुकाध्यक्ष सतिश पठाडे तसेच सर्व तालुकाध्यक्षा सह नगर दक्षिण चे कार्यकर्ते उपस्थित होते.

राष्ट्रवादीचे नगर दक्षिणचे उमेदवार निलेश लंके यांची अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेत पाठिंब्याचं पत्र दिले आहे या पत्रात असे म्हटले आहे की होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुक २०२४ संदर्भात आपण अहमदनगर दक्षिण (अहिल्यानगर) लोकसभा मतदार संघासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवीत आहात अहमदनगर जिल्हयाच्या व देशाच्या भवितव्याची ही निवडणूक असून प्रत्येक सुज्ञ नागरिकांनी, सामाजिक घटकांनी व सामाजिक संघटनांनी आपल्या या घटनात्मक उत्तरदायित्वाचा योग्य वापर केल्यास ही लोकशाही नक्कीच सुदृढ होईल म्हणून देशातील मराठ्‌याची सर्वात जुनी संघटना असलेली व मराठा समाजाच्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी व आरक्षणासाठी स्व. अण्णासाहेब पाटील व स्व शशिकांत पवार यांच्या नेतृत्वाखाली लढा देत असलेल्या अखिल भारतीय मराठा महासंघ या संघटनेचे जाळे संपूर्ण महाराष्ट्र राज्यात तसेच भारत देशातही क्षत्रिय संघटनेच्या नावाने सक्रिय आहे.हजारो सभासद या संघटनेत कार्यरत आहेत. अहमदनगर जिल्ह्यात ही गेली तीस वर्षापासून संघटना कार्यरत आहे. प्रत्येक तालुक्यात, गावागावापर्यंत संघटनेचे सभासद व कार्यकर्ते सक्रिय आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न सध्या गंभीर समस्या बनला आहे. आरक्षणा अभावी गोरगरीब मराठा समाजातील विद्‌यार्थी हुशार असूनही नोकऱ्यापासून वंचित आहेत.

नुकत्याच झालेल्या मराठा आरक्षण आंदोलनामध्ये आपले राजकीय नुकसान होईल म्हणून कुठलाही लोकप्रतिनिधी यात सहभागी झालं नाही परंतु समाजाच्या प्रश्नामाठी आपण निर्भीडपणे मंत्रालयाच्या दारात आंदोलने करून, सभागृहामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न जोरकसपणे लावून धरला, त्याचबरोबर शेतक-यांच्या मालाला हमीभाव मिळावा यासाठी आपण वेळोवेळी आंदोलने केली व आवाज उठवला, विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी देखील आपण सतत प्रयत्नशील असता. असे पाठिंब्याच्या पत्रामध्ये अखिल भारतीय मराठा संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे त्यामुळेच आम्ही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिनशर्त पाठिंबा दर्शवित आहोत. असे त्यांनी म्हटले आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!