राहाता प्रतिनिधी / विट्ठल ठोंबरे : लोकशाहीत मतदान हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आणि जबाबदारी आहे. हे असे साधन आहे ज्याद्वारे व्यक्ती आपली प्राधान्ये व्यक्त करू शकतात आणि त्यांच्या जीवनावर परिणाम करणारे निर्णय घेऊ शकतात. मतदानाद्वारे, नागरिक त्यांचे प्रतिनिधी निवडू शकतात, कायदे आणि धोरणे मंजूर करू शकतात किंवा नाकारू शकतात आणि त्यांच्या समुदायाला भेडसावणाऱ्या महत्त्वाच्या समस्यांवर निर्णय घेऊ शकतात.
नांदूर बु. खु.गावात या वर्षी खूप छान प्रकारे मतदान पार पडले. सर्वांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केले व जास्तीत जास्त मतदान करण्याचा प्रयत्न केला. या वर्षी 13 मे 2024 रोजी सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. नांदूर गावामध्ये कडक बंदोबस्त असल्यामुळे कोणत्याही प्रकारे गैरप्रकार घडला नाही. आज दुपारी 01:00 वाजेच्या दरम्यान बूथ क्र.138 मध्ये 49%, क्र.139 मध्ये 43%, क्र.140 मध्ये 55% असा मतदानाचा कौल होता. परंतु दुपार नंतर मतदारांनी मतदान बूथ वर मोठ्या प्रमाणात गर्दी करुन मतदानाची टक्केवारी वाढवण्याचा प्रयत्न केला.आज संध्याकाळी 6:00 वा. बूथ क्र. 138- 66% टक्के ,क्र.139-63% टक्के ,क्र.140-64% टक्के असे एकूण मतदान झाले आहे.यावर्षी मतदान चांगल्या प्रकारे झाल्याचे यावरून समजते.नांदूर गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सभासद, कर्मचारी वर्ग, निवडणूक कर्मचारी या सर्वांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केले. तसेच सर्व मतदारांनी लोकशाही मार्गाने आपला हक्क बजावला.
Leave a reply