राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मागच्या वर्षी -सन 2023 मध्ये एकूण 112 मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल होते. पैकी केवळ बारा गुन्हे अद्याप पर्यंत उघडकीस आलेले आहेत. तालुक्यामध्ये आजही बऱ्याच मोठ्या प्रमाणात विना नंबर प्लेट वाहने चालतात. विना नंबर वाहनाकडून अपघात घडून वाहन निघून गेल्यास त्याचा शोध लावण्यात अडचणी येतात. त्यामुळे चोरीच्या गाड्या कुणाच्या वापरात आहेत का हे शोधून काढण्याच्या उद्देशाने व भविष्यात वाहनाकडून अपघात झाल्यास त्या वाहनाचा तात्काळ शोध लागण्याच्या हेतूने आज राहुरी पोलीस स्टेशन अंतर्गत एकूण 25 आमलदार व 65 होमगार्ड मिळून एकूण सहा पथाके तयार करण्यात आली.
सदर सहा पथकांमार्फत राहुरी शहरातील मल्हारवाडी चौक, बारागाव नांदूर चौक, शनिशिंगणापूर फाटा, शनी मंदिर चौक, पाच नंबर नाका, पाण्याची टाकी चौक अशा सहा ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. सदर नाकाबंदीत एकूण 76 वाहने विना नंबर प्लेट तसेच फॅन्सी नंबर प्लेट च्या आढळून आल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून त्यांच्या कागदपत्रांची शहानिशा करून भविष्यात त्यांच्यावर परत दंडात्मक कारवाई होऊ नये याकरिता त्यांच्याकडून तात्काळ नंबर प्लेट बसवून घेऊन योग्य तो दंड आकारून त्यांना सोडून देण्यात आले. तसेच चार गाड्यांचे कुठलेही कागदपत्र उपलब्ध नसल्याने सदर गाड्या चोरीच्या आहे किंवा कसे याबाबत खात्री करून गुन्हा दाखल करणार आहोत.
सदरची कारवाई मा.श्री.राकेश ओला सो. पोलीस अधीक्षक अहमदनगर, मा.श्री.वैभव कलुबर्मे सो.अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर जि.अहमदनगर, श्री.डॉ.बसवराज शिवपुजे सो. उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर उपविभाग जि.अहमदनगर यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पो.नि.संजय आर.ठेंगे यांचे नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे, पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ, सहाय्यक फौजदार तुळशीराम गीते, सुनील फुलारी, एकनाथ आव्हाड, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरज गायकवाड, राहुल यादव, विकास वैराळ, जानकीराम खेमनर, शकुर् सय्यद, वाल्मीक पारधी, पोलीस नाईक रामनाथ सानप, बाबासाहेब शेळके, विकास साळवे, पो.कॉ.जयदीप बडे, प्रमोद ढाकणे, नदीम शेख, सचिन ताजने, गणेश लीपने, आदिनाथ पाखरे, जालिंदर धायगुडे, प्रवीण आहीरे, रवी पवार, अमोल गायकवाड, भाऊसाहेब शिरसाठ, संतोष राठोड, रवी कांबळे, गोवर्धन कदम, अंकुश भोसले, रोहित पालवे नेमणुक राहुरी पोलीस स्टेशन जि.अहमदनगर यांनी केलेली आहे.
विना नंबर प्लेट व फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या 76 गाड्यांवर राहुरी पोलिसांकडून दंडात्मक कारवाई, एकूण 46000/- दंड

0Share
Leave a reply