श्रीरामपूर प्रतिनिधी / इनायत अत्तार : शहरातील नेवासा रोड वरील आयडीबीआय बँकेसमोर एका तरुणावर तीन जणांनी कत्तीच्या साह्याने वार करून प्राणघातक हल्ला केला. ही घटना काल बुधवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली. श्रीरामपूर शहरातील नेवासा रोड वरील आयडीबीआय बँक परिसरात राहणारा विशाल साळवे याच्यावर तीन जणांनी कत्तीच्या साह्याने वार केले. यामध्ये सदर तरुण गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ साखर कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी लोणी येथे हलवण्यात आले आहे. त्या तीन तरुणांनी विशाल साळवे या तरुणावर हल्ला का केला, याचे नेमके कारण समजू शकले नाही. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात कोणत्याही प्रकारच्या गुन्ह्याची नोंद झालेली नव्हती.
Leave a reply