Disha Shakti

क्राईम

बीअर बारच्या परवान्यासाठी घेतली 3.25 लाखांची लाच, उत्पादन शुल्कचा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

Spread the love

नागपूर  प्रतिनिधी  : शहरातील राज्य उत्पादन शुल्क विभगाच्या निरीक्षकाला 3 लाखांची लाच घेतांना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभगाने (एसीबीची) सापळा रचून केली. रवींद्र लक्ष्मण कोकरे (वय ४९ वर्ष, पद- निरीक्षक , राज्य उत्पादन शुल्क विभाग ई विभाग,वर्ग-२) असे अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. माहितीनुसार, नागपुरातील फ्रेंड्स कॉलोनी येथे राहणाऱ्या 31 वर्षीय व्यक्तीने केलेल्या तक्रारीनुसार, नवीन FL-III परवाणाचे व्हेरिफिकशन करून अधीक्षकाकडे त्याची या फाईलपाठविण्या करीता

आरोपी अधिकारी कोकरे यांनी 4 लाख रुपयांच्या रकमेची मागणी केली होती. मात्र इतकी रक्कम तक्रारदार देऊ शकत नसल्याने कोकरे यांना 3 लाख 25 हजार रुपये घेण्याचे ठरविले.मागणी अंती लाच घेताना एसीबीची सापळा रचून कोकरे यांना रंगेहाथ पकडले असून त्यांना अटक केली आहे. याप्रकरणी बर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिकाऱ्याची कसून चौकशी करण्यात येत आहे.

ही कारवाई राहुल माकणीकर (पोलीस अधीक्षक) संजय पुरंदरे(अपर पोलीस अधीक्षक) यांच्या मार्गर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण लाकडे, नापोशी सारंग बालपांडे,पोहवा अस्मिता मेश्राम, पोहवा विकास सायरे, नापोशी राजू जांभूळकर यांनी केली.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!