विशेष प्रतिनिधी / वसंत रांधवण : प्रेमाला वयाचे कसल्याही प्रकारचे बंधन नसते,याची प्रचिती गेल्या काही महिन्यांपासून अहमदनगर जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात आली आहे. कारण वयात आलेल्या मुलींसह लग्न झालेल्या महिलाही पळून जाण्याचे वाढलेले प्रमाण हा चिंतेचा विषय झाला आहे. याला जबाबदार कोण,यावर निर्बंध कसा आणायचा हा खरा प्रश्न मुलींच्या वडीलांना जसा आहे. तसाच तो लग्न झालेल्या महिलेच्या पतीला,आई – वडील,सासू – सासऱ्यांनाही आहे.
जातीपातीचा विचार न करता वयात आलेली मुले – मुली सैराट होतात आणि लग्न करतात. यावेळी ही मुले – मुली खरेतर वयामुळे पळून जात असतील पण लग्न झालेल्या महिला सुद्धा सैराट होत आहेत. तेही लग्न होऊन मुले बाळं असताना कशाचाही विचार न करता आपला सुखाचा संसार अक्षरशः देशोधडीला लावत न लग्न झालेल्या मुलांबरोबर सैराट होतात, ही बाब अतिशय चिंताजनक आहे. समाजात तसेच पै पाहुणे यामध्ये बेईज्जत होऊ नये म्हणून अशा गंभीर घटना घडूनही गप्पच बसावे लागत आहे. यावर पायबंद घालणे आवश्यक आहे. पण पायबंद कसा घालायचा हा खरा प्रश्न पालक आणि इतर नागरिकांपुढे आहे. याला सध्याचे सोशल मीडिया सुद्धा कारणीभूत आहे. कारण या सोशल मीडियामुळे सहजासहजी संपर्कात राहणे शक्य आहे म्हणून याचा परिणाम सैराट होण्यास कारणीभूत असा होतो.
आळंदीत लग्न लावून देण्याचा प्रकार तेजीत
पळून जाणारे मुले – मुली ही पुणे जिल्ह्यातील आळंदी याठिकाणी जाऊन आपल्याला लग्नाच्या बेडीत अडकून घेतात. आळंदी याठिकाणी सैराट आशा प्रकारचे विवाह लावले जातात.मोठी आर्थिक देवाणघेवाण करून लग्न लावून त्याठिकाणी कोणतेही सबळ पुरावे, साक्षीदार नसतात सुद्धा सर्रास लग्न लावून दिली जातात. मग त्याठिकाणी सबळ पुरावे दिल्यामुळे मुलीचे आई – वडील किंवा पोलिस प्रशासनाला कोणतीही कारवाई करता येत नाही. आळंदी येथील लग्न लावून देण्याचा हा प्रकार तेजीत सुरू असून यावर प्रशासनाने निर्बंध घालणे आवश्यक आहे. खरेतर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या पवित्र याठिकाणी लग्न लावून देण्याचा प्रकार बंद केला पाहिजे.
Leave a reply