राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : पतीच्या चारित्र्यावर संशय घेवून पत्नी व तीच्या नातेवाईकांनी पती अमोल गोरे या तरुणाला लाकडी दांडा व लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना राहुरीतील येवले आखाडा येथे घडली आहे. अमोल गोरक्षनाथ गोरे (वय 26 वर्षे, रा. येवले आखाडा, ता. राहुरी, हल्ली रा. आढळगांव ता. श्रीगोंदा) या तरुणाने राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले कि, अमोल गोरे याची पत्नी निर्मला ही अमोल गोरे याच्या चारित्र्यावर संशय घेवून नेहमी वाद घालते व माहेरी निघुन जाते.
एका महिले सोबत अनैतिक संबंध आहे. या संशयावरुन निर्मला ही सुमारे तीन महिन्यांपुर्वी तिचे माहेरी उक्कलगाव ता. श्रीरामपुर येथे निघुन गेली आहे. दि. 13 मे 2024 रोजी दुपारी 5 वाजे दरम्यान अमोल गोरे हा घरासमोर चहा पित असताना तेथे त्याची पत्नी व इतर आरोपी आले. तेव्हा अमोल याची पत्नी म्हणाली की, माझ्या मुलांची तु काय सोय करणार आहेस? असे म्हणुन तिने व इतर आरोपींनी अमोल गोरे याच्यासह एका महिलेला शिवीगाळ करुन लाकडी दांडा व लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.
अमोल गोरक्षनाथ गोरे याच्या फिर्यादीवरून आरोपी निर्मला अमोल गोरे, राकेश शरद रजपुत, महेश शरद रजपुत, प्रदिप पवार, दिपक पवार, नितिन भागवत पवार, सर्व रा. उक्कलगांव, ता. श्रीरामपुर. यांच्यावर गु र.नं. 575/2024 भादंवि कलम 324, 323, 504, 506, 143, 147, 148, 149 प्रमाणे शिवीगाळ व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Leave a reply