Disha Shakti

क्राईम

कोल्हारमध्ये दोन गटांत तुफान हाणामारी, परस्परविरोधी विनयभंग, पोक्सोसह अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल, 6 आरोपींना अटक

Spread the love

विशेष प्रतिनिधी / वसंत रांधवण  : कोल्हार येथे दोन गटात लोखंडी पाईप व लाकडी दांडक्याने तुफान हाणामार्‍या झाल्या. एका गटाने फिर्यादीच्या घरात घुसून तिच्या अल्पवयीन नणंदेचा विनयभंग केला तर दुसर्‍या गटाच्या फिर्यादीला जातीवाचक शिवीगाळ करून लोखंडी पाईप व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण झाल्याने तो गंभीर जखमी झाल्याची घटना कोल्हारमध्ये घडली. याबाबत लोणी पोलीस ठाण्यात विनयभंगासह अ‍ॅट्रोसिटी अशा परस्पर विरोधी फियांदी दाखल झाल्या आहेत. याबाबत अंविकानगर, कोल्हार ता.राहाता येथील एका महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, शनिवारी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास आरोपी आकाश विजय बोरुडे, विशाल सुनील जाधव, आकाश भाऊसाहेब वाघ, भारत फकिरा बर्डे सर्व रा. कोल्हार बुद्रुक हे छोटू शाम गोसावी याच्या सांगण्यावरून आमच्या घरात घुसून मला धक्काबुक्की करून लोटून दिले. त्यानंतर अल्पवयीन नणंद हिचे जवळ जाऊन तिचे कपडे ओढून ताणून फाडले व तिचे अंगाला हात लावून तिच्यासोबत बळजबरीने झटून तिचा विनयभंग केला. यावरून लोणी पोलिसांनी वरील आरोपींविरूध्द भादंवि कलम 452, 323, 504, 506 बालकांचे लैगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 8, 12 प्रमाणे गुन्हा दाखल केला. घटनेचा तपास पोसइ चौधरी करीत आहेत.

दुसरी फिर्याद आकाश भाऊसाहेब वाघ रा.अंबिकानगर कोल्हार बुद्रुक यांनी दिली असून त्यात म्हटले आहे, शनिवारी रात्री 10.30 ते 11 वाजेच्या सुमारास मित्र विशाल सुनील जाधव, भारत फकिरा बर्डे, आकाश विजय बोरुडे असे बसस्टँण्ड कोल्हार बुद्रुक जवळील त्रिमूर्ती पान शॉप येथून घरी जात असतांना इम्पिरीयल चौक येथे बुडान (पूर्ण नाव माहीत नाही) अकबर (पूर्ण नाव माहीत नाही) मन्सुर भाई यांचा मुलगा असे मोटारसायकलवर लोणी बुद्रुक दिशेने येऊन माझ्यासमोर मोटारसायकल लावून त्यांच्यातील बुडान याने मित्र भारत फकिरा बर्डे याची गच्ची धरून त्यास शिवीगाळ केली. अकबर याने त्याचे हातातील कडा मारण्यासाठी काढून मारणार तेव्हा मी त्यांना का म्हणून शिवीगाळ व मारहाण करताय अशी विचारणा केली. त्यावर तू … पण खुप माजला आहे, अशी जातीवाचक शिवीगाळ करून बुडान याने त्याचे मोबाईलवरून फोन केला.

फोनवर म्हणाला, इधर इंम्पेरीअल चौक में आओ, ये (आमच्या जातीचा उल्लेख करून) छोकरे बहुत माजे गये. तेथे लगेच आरोपी शाहरुख नवाज शेख, मतीन मुनीर पिंजारी, बिलाल शेख, सलमान लिटर, शाहनवाज शेख, अली शेख, मुबारक शेख, साजीद पठाण, माजीद पठाण, जाईद फैजान, खान वसिम, सिंकदर शेख व इतर काही मुले असे तेथे पळत येवून त्यांनी लोखंडी पाईप व लाकडी दांडक्याने मला व माझ्या मित्रांना जबर मारहाण केली. मारहाणीत माझ्या डोक्यास जबर मार लागला. या फिर्यादीवरून भादंवि 324, 323, 504, 143, 147, 148, 149,अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 3(1) प्रमाणे 15 आरोपींविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. या दोन्ही घटनेत 6 आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास डिवायएसपी शिरीष वमने करीत आहेत.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!