Disha Shakti

इतर

अकोल्यातील सुगाव येथील प्रवरा नदी पात्रात दोन युवक बुडाले, एकाचा मृतदेह आढळला तर दुसर्‍याचा शोध सुरू

Spread the love

अकोले / गंगासागर पोकळे : अकोले तालुक्यातील सुगाव येथील रोपवाटीके जवळील प्रवरा नदी पात्रात दोन युवक बुडून मयत झाल्याची दुदैवी घटना घडली आहे. अकोले तालुक्यातील सुगाव येथे हे युवक मुरघास बनविण्यासाठी धुमाळ वस्तीवर आले होते. उष्णतेमुळे सदर युवक सागर पोपट जेडगुले (वय 25 रा. धुळवड ता. सिन्नर) तर अर्जुन रामदास जेडगुले (वय 18 रा. पेमगिरी, ता. संगमनेर) हे प्रवरा पाञातील पाझर तलावाजवळ आंघोळीसाठी पाण्यात उतरले असता त्यांना पाझर तलावाच्या पडणार्‍या पाण्याच्या दाबाचा व पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने या दोघेही मयत झाले आहेत.

सागर जेडगुले याचा मृतदेह हाती लागला असुन अकोले ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे तर अर्जुन याचा मृतदेहाचा शोध चालु असुन स्थानिक ग्रामस्थ व नातेवाईक यांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली होती. मात्र, बराच वेळ झाल्यानंतर प्रांताधिकारी यांनी मृतदेह सापडत नसल्याने रेस्युक्यु टीमला रवाना करत मदत पोहचवली आहे. यावेळी अकोले पोलिस स्टेशनचे कर्मचारी, कामगार तलाठी,पोलिस पाटील व स्थानिक नागरिक उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!