राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : दिनांक 15/5/2024 रोजी 13.25 वाजण्याचे पूर्वी किसन नामे विजय अण्णासाहेब जाधव यास गुन्ह्यातील आरोपींनी अज्ञात कारणाकरता लाकडी दांड्याने मारहाण करून त्याचे दोन्ही हात व दोन्ही पाय कपड्याच्या सहाय्याने बांधून शिलेगाव गावचे स्मशानभूमी जवळ असणारे प्रसाद तागड यांचे विहिरीमध्ये टाकून जीवे ठार मारले त्याबाबत राहुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 581/24 भारतीय दंड संहिता कलम 302 34 प्रमाणे दाखल करण्यात आलेला आहे.
सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी दिगंबर दिलीप म्हसे राहणार शिलेगाव तालुका राहुरी हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता आरोपी वास्तव बाबत कोणतीही माहिती उपलब्ध नसतांना फक्त तांत्रिक पुराव्याचे आधारे आरोपी चे मोबाईल क्रमांकाची विश्लेषणात्मक माहिती प्राप्त करून त्यावरून आरोपी हा पुणे येथे वास्तव्यास असल्याची तपासात मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेऊन त्यास गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आलेली आहे. सदर आरोपीस आज रोजी माननीय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी राहुरी यांच्यासमक्ष हजर केले असता, न्यायालयाने आरोपीस दिनांक 28/05/2024 रोजी पावेतो पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे. माननीय न्यायालयात आरोपीचे पोलीस कस्टडी रिमांड करिता सरकारतर्फे सरकारी वकील श्री रवींद्र गागरे यांनी कामकाज पाहिले आहे.
सदरची कारवाई मा.श्री.राकेश ओला सो. पोलीस अधीक्षक अहमदनगर, मा.श्री.वैभव कलुबर्मे सो.अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर जि.अहमदनगर, श्री.डॉ.बसवराज शिवपुजे सो. उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर उपविभाग जि.अहमदनगर यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पो.नि.संजय आर.ठेंगे यांचे नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे, पोलीस उपनिरीक्षक बोडखे, सहाय्यक फौजदार आव्हाड,पोलीस हेडकॉन्स्टेबल सुरज गायकवाड, राहुल यादव ,विकास साळवे, पोलीस कॉन्स्टेबल संतोष राठोड, भाऊसाहेब शिरसाठ,नदीम शेख, प्रमोद ढाकणे, गोवर्धन कदम, सतीश कुराडे, सचिन ताजने, जयदीप बडे, गोपनीय शाखेचे पोहेकॉ अशोक शिंदे, पोशी दादासाहेब रोहकले, क्राईम अंमलदार आजिनाथ पाखरे, नेमणुक राहुरी पोलीस स्टेशन जि.अहमदनगर तसेच मा.अपर पोलीस अधीक्षक कार्यालयातील तांत्रिक विभागाचे पोना सचिन धनाड,पो शि संतोष दरेकर यांनी वेळोवेळी दिलेल्या तांत्रिक माहितीच्या आधारे केलेली आहे.
Leave a reply