Disha Shakti

इतर

गोटुंबे आखाडा येथे पाण्याने घेतला महिलेचा बळी, कर्तबगार महिला गेल्याने कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

Spread the love

राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी तालूक्यातील गोटुंबे आखाडा येथे शनिशिंगणापूर रोडवर पिण्याचे पाणी आणण्यासाठी गेली असता सदर महिला पाण्याचा हंडा घेऊन रस्ता क्रॉस करत असताना रस्त्याला गतिरोधक नसल्याने भरधाव वेगात असलेल्या अज्ञात  कारने या महिलेला जोराची धडक देऊन महिलेला 20 ते 30 फरफटत नेल्याने महिलेला मोठ्या प्रमाणात मार लागला असता स्थानिक ग्रामस्थांनी सदरील महिलेला तात्काळ राहुरी येथे पुढील उपचारासाठी नेले असता  महीलेच्या डोक्याला व तोंडाला मोठ्या स्वरूपात मार लागल्याने  राहुरी येथील हॉस्पिटल येथे उपचार चालू असताना काही वेळातच गयाबाई गंगाराम तमनर  यांची  प्राणज्योत मालवली.

या घटनेने गावातील महिलांनी धास्ती धरली असून दोन दिवसांपूर्वी काही महिला पाण्यासाठी ग्रामपंचायतवर मोर्चा घेऊन गेल्या होत्या पण पाण्याचा प्रश्न मार्गी न लागल्याने महिलांना सोनई पाईपलाईन वरून वाहनांचा जास्त वावर असणाऱ्या शिंगणापूर रोडवरून जीव मुठीत धरून पाण्याची वाहन करावी लागते काल सायंकाळी ७ ते सव्वा सातच्या दरम्यान सदरील महिला रस्ता क्रॉस करत असताना एक अज्ञात ओमीनी वाहनचालकाने या महिलेला जोराची धडक देऊन पळून गेल्याने नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. सदरील महिलाच कर्तबगार व कुटुंबाचा गाडा चालवत असताना अशी घटना घडल्याने कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला असून कुटुंबाने मोठा आक्रोश केला आहॆ.

गोटुंबे आखाडा येथे गतीरोधकबाबत अनेकवेळा सार्वजनिक बांधकाम विभागाला मागणी करूनही अजूनपर्यंत दखलन घेतल्याने या महिलेचाबळी गेलाअसून गतिरोधक नसल्याने वाहन चालक वेगावर नियंत्रण ठेवत नसल्याने या गावात अनेक अपघात झालेले आहेत परंतु प्रशासनाला अजूनही जाग आलेली नसून अजून किती बळी घेणार अशा ग्रामस्थांमध्ये तिव्र प्रतिक्रिया उमटत आहॆ. 


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!