राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी तालूक्यातील गोटुंबे आखाडा येथे शनिशिंगणापूर रोडवर पिण्याचे पाणी आणण्यासाठी गेली असता सदर महिला पाण्याचा हंडा घेऊन रस्ता क्रॉस करत असताना भरधाव वेगात असलेल्या अज्ञात वाहनाने या महिलेला धडक देऊन महिलेला 20 ते 30 फरफटत नेल्याने महिलेला मोठ्या प्रमाणात मार लागला असता स्थानिक ग्रामस्थांनी सदरील महिलेला तात्काळ राहुरी येथे पुढील उपचारासाठी नेले असता सदरील महिलेल्या डोक्याला व तोंडाला मोठ्या स्वरूपात मार लागल्याने उपचार चालू असताना गयाबाई गंगाराम तमनर या महीलेची प्राणज्योत मालवली.
राहुरी शिंगणापूर रोडवर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते परंतु गोटुंबे आखाडा या गावात गतिरोधक बाबत अनेक वेळा सार्वजनिक बांधकामविभागाला अनेकवेळा निवेदन देऊनही प्रशासनाने योग्य दखल न घेतल्याने व यामध्ये महिलेचा निष्पाप बळी गेल्याने संतप्त ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत अपघातात मृत्यु झालेल्या महिलेचा मृतदेह रोडवर ठेवून रास्तारोको करण्यात आला यावेळी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते.
डॉ.आण्णासाहेब बाचकर, विजय तमनर, उमेश बाचकर, ज्ञानेश्वर बाचकर, रवींद्र चौधरी, दिपक शेडगे, दिपक लांबे यांनी आक्रमक भूमिका घेऊन शासनाचा जाहीर निषेध व्यक्त केला व ग्रामस्थांनी या घटनेच्या निषेधार्थ प्रशासनाच्या विरोधात घोषणा दिल्या व दोन दिवसांत गोटुंबे आखाडा येथे गतिरोधक न बसविल्यास दोन दिवसांनंतर गोटुंबे आखाडा हद्दीतील शिंगणापूर रस्ता जेसीबीच्या सहाय्याने खोदून टाकण्याचा इशारा यावेळी ग्रामस्थांच्यावतीने प्रशासनाला देण्यात आला व शासनाचा निषेध म्हणून शिंगणापूर रस्त्यावर या महिलेचा दशक्रिया विधी करण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांच्यावतीने देण्यात आला आहॆ.
यावेळी ग्रामस्थांच्यावतीने नायब तहसीलदार संध्या दळवी व सहाय्यक पोलीस निरीक्षक पिंगळे साहेब यांना ग्रामस्थांच्यावतीने निवेदन देण्यात आले यावेळी डॉ.आण्णासाहेब बाचकर, विजय तमनर, उमेश बाचकर, ज्ञानेश्वर बाचकर, रवींद्र चौधरी, कुंदन बाचकर, शिवाजी पवार, दिपक शेडगे, दिपक लांबे, सरपंच मालतीताई साखरे, उप सरपंच, तुकाराम, बाचकर, सदस्य मीनाताई घोकसे, यांच्यासह मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामस्थांची आक्रमक भूमिका बघता नायब तहसीलदार संध्या दळवी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे तारडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दोन दिवसांत गतिरोधक प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्याने ग्रामस्थांनी रस्ता मोकळा केला व त्यानंतर सदरील मृतदेह अंत्यविधीसाठी नेण्यात आला.
यावेळी राहुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पिंगळे , सहाय्यक पोलीस उप निरीक्षक एकनाथ आव्हाड, पो/ कॉ.दादासाहेब रोहकले, जालिंदर धायगुडे,दुधाडे व पो.ना आवारे व यांनी ट्रॉफीक सुरळीत करण्याचे काम केले.
गोटुंबे आखाडा येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत महिलेचा बळी, कर्तबगार महीला गेल्याने कुटुंबाचा आक्रोश गोटुंबे आखाडा येथे गतिरोधक नसल्या कारणाने संतप्त ग्रामस्थांनी मृतदेह रस्त्यावर ठेवून केला रास्ता रोको

0Share
Leave a reply