Disha Shakti

इतर

अपघातग्रस्त रुग्ण घेऊन चालेल्या रुग्णवाहिकेची एसटी बसला धडक, रुग्ण ठार तर चौघे जखमी

Spread the love

संगमनेर प्रतिनिधी / गंगासागर पोकळे : संगमनेर तालुक्यातील कोंची येथील अपघातातील जखमी रुग्णाला उपचारांसाठी घेऊन येणार्‍या रुग्णवाहिकेने राज्य परिवहन महामंडळाच्या बसला समोरून जोराची धडक दिली. यामध्ये जखमी रुग्णाचा मृत्यू झाला तर इतर चौघे जखमी झाले आहेत. सदर भीषण अपघात कोकणगाव शिवारात रविवारी (दि. 26 मे) रात्री सव्वाआठ वाजेच्या सुमारास घडला आहे.

कोंची येथे दुचाकीचा अपघात होऊन बाळासाहेब धोंडीराम गिते (वय 55, रा. कोंची) हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारार्थ हलवण्यासाठी संगमनेरातून रुग्णवाहिका बोलावली होती. सदर रुग्णवाहिका (क्र. एमएच.17, एजी.8002) जखमीला घेऊन संगमनेरला येत असताना कोकणगाव शिवारात हयगयीने वाहन चालवून बसला (क्र. एमएच.14, बीटी.380) समोरुन जोराची धडक दिली. यामध्ये जखमी रुग्ण बाळासाहेब गिते यांचा मृत्यू झाला तर गणेश लहानू गिते, संदीप भाऊसाहेब गिते, रुग्णवाहिका चालक व बसचालक किरकोळ जखमी झाले आहे.

याप्रकरणी बसचालक सुनील शांतिलाल सोनवणे (वय 45, रा. सोयगाव, ता. मालेगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रुग्णवाहिका चालक सागर दगडू वाडेकर (रा. रायते वाघापूर, संगमनेर) याच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. संपत जायभाये हे करत आहेत.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!