Disha Shakti

शिक्षण विषयी

आरडगाव येथील तक्षज्ञ कॉलेजचा १०० टक्के निकाल, विज्ञान शाखेतील रेणुका शेटे हिने पटकाविला द्वितीय क्रमांक

Spread the love

राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी तालुक्यातील आरडगाव येथील तक्षज्ञ ज्युनियर कॉलेजच्या कला व वाणिज्य शाखेचा निकाल १०० टक्के लागला असून या कॉलेजमधील विज्ञान शाखेमध्ये शिक्षण घेणारी राहुरी खुर्द येथील तरुणी रेणुका अशोक शेटे (८१ टक्के) गुण पटकावून द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहॆ.

या कॉलेजमधील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना तक्षज्ञ ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य जगदीश मुसमाडे व प्रशासन अधिकारी महेश मुसमाडे तसेच सर्व शिक्षक वृंदांचेही मार्गदर्शन व तसेच अशोक किसन शेटे अनिल तुकाराम वाघ यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले. सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब मुसमाडे तसेच स्थानिक समिती पदाधिकाऱ्यांनी कौतूक केले आहे. तर रेणुका शेटे या विद्यार्थीनीचे सर्वच क्षेत्रातून कौतुकाचा वर्षाव होत आहॆ.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!