राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : दि.18/05/2024 रोजी अल्पवयीन मुलगी ही राहते घरातून तिचे आई सोबात घरघुती वाद झाल्याने घरात कोणास काहीएक न सांगता निघून गेल्याने राहुरी पोलीस ठाणे गुरनं. 626/2024 भादवि कलम 363 प्रमाणे दिनांक 28/05/2024 रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. दाखल गुन्हाचे बाबत गोपनीय बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे व गुन्हाचे तांत्रिक विष्लेशन करुन नमुद गुन्हातील अल्पवयीन मुलीला राहुरी पोलीस स्टेशनचे पथकाने कळमदरी, तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक पोलिस स्टेशन हद्दीत शोध घेऊन तात्काळ ताब्यात घेतले.
सदर कारवाई मा.राकेश ओला पोलिस अधीक्षक सो, अहमदनगर, मा. वैभव कुलुबर्मे अपर पोलिस अधीक्षक अहमदनगर, मा. बसवराज शिवपूजे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर विभाग जि. अहमदनगर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संजय आर.ठेंगे पोलीस निरीक्षक राहुरी पोलीस स्टेशन,पोहेकॉ जानकीराम खेमनर,पोकॉ/दुधाडे, मपोकॉ/कुसळकर यांनी केली आहे पुढील तपास पोहकॉ जानकीराम खेमनर, हे करत आहेत.
Leave a reply