पारनेर प्रतिनिधी / गंगासागर पोकळे : सर्वसामान्यांचा चेहरा म्हणून पारनेर तालुक्याच्या उत्तर भागामध्ये ज्यांना ओळखले जाते असे पळशी गावचे लोकनियुक्त सरपंच प्रकाश राठोड यांचा आज वाढदिवस कोणताही राजकीय वारसा नसताना सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी व समस्यांसाठी नेहमीच काम करत असलेले प्रस्थापितांच्या विरोधात आवाज बुलंद करत राजकारण समाजकारण करण्याची प्रेरणा असलेले व्यक्तिमत्व म्हणजेच प्रकाश राठोड होय.
पळशी हे पारनेर तालुक्यातील ऐतिहासिक गाव प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाते अशा या गावच्या सरपंच पदी काम करण्याची संधी प्रकाश राठोड यांना 2021 मध्ये मिळाली. गावच्या विकासासाठी आणि गावाला राजकीय पातळीवर ओळख निर्माण करून देण्यासाठी प्रकाश राठोड हे काम करत आहेत. पळशी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज राहतो आदिवासी समाजाचे प्रश्न खऱ्या अर्थाने ज्यांनी जाणून घेतले आणि ते सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत असे राठोड हे खऱ्या अर्थाने दिन दुबळ्यांचे नेते म्हणून सध्या पारनेर तालुक्यात ओळखले जाऊ लागले आहेत.
आमदार निलेश लंके यांचे खंदे समर्थक म्हणून ज्यांना पारनेर तालुक्यात ओळखले जाते असे प्रकाश राठोड हे आमदार लंके यांच्या नेतृत्वाखाली पळशी गावच्या विकासासाठी कटिबद्ध आहेत. सर्व पक्षांमध्ये ज्यांचा मित्रपरिवार आहे असे प्रकाश राठोड हे खऱ्या अर्थाने एक सर्वसामान्य आदर्श व्यक्तिमत्व म्हणून समाजात काम करत आहे.
राजकीय सामाजिक जीवनात अनेक चढ-उतार पार करत प्रस्थापितांच्या विरोधात आवाज बुलंद करत 2021 साली पळशी ऐतिहासिक गावच्या सरपंच पदी प्रकाश राठोड या सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तिमत्त्वाला जनतेने डोक्यावर घेऊन सरपंच पदावर बसविले.
पळशी या ठिकाणी प्रति पंढरपूर म्हणून विठ्ठल रुक्मिणीचे आदर्श असे मंदिर आहे.वारकरी संप्रदायाचा वारसा येथे जपला जातो या देवस्थानला राज्यात अ वर्ग तीर्थक्षेत्र म्हणून मान्यता देण्यासाठी प्रकाश राठोड हे आमदार निलेश लंके यांच्या माध्यमातून प्रयत्न करत आहेत.
पळशी भागात आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात राहतो राजूर प्रकल्पाच्या माध्यमातून आदिवासी समाजासाठी मोठमोठे प्रकल्प व योजना राबवल्या जातात या योजना सर्वसामान्य आदिवासी बांधवांना मिळविण्यासाठी प्रकाश राठोड हे आमदार लंकेच्या माध्यमातून नेहमीच प्रयत्नशील असतात या भागातील आदिवासी समाजासाठी काम करत असताना अनेक योजनांचा फायदा त्यांनी करून दिला आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने प्रकाश राठोड आदिवासी वादळ म्हणून आता पारनेर तालुक्यात ओळखले जाऊ लागले आहे. आदिवासींचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे सध्या पाहिले जात आहे.पळशी गावातील स्थानिक रस्ते जोडण्यासाठी शेत पानंद च्या माध्यमातून पाच कोटीचा भरीव निधी सरपंच राठोड यांनी गावांमध्ये आणला आहे तसेच शाळा खोल्यांसाठी निधी रस्त्यांसाठी निधी व जलजीवन योजनेच्या माध्यमातून गावातील प्रत्येक वाडी वस्तीवर पिण्याचे पाणी पोहोचविण्यासाठी त्यांनी १ कोटी ९२ लाखाचा निधी त्यांनी आणला आहे. हाय मॅक्स अधिव्य बसवून पळशी गावाला त्यांनी लखलखाटीत केले आहे.
सर्वसामान्य कुटुंबातून पुढे येऊन प्रकाश राठोड यांनी खऱ्या अर्थाने राजकारणात समाजकारणात साथ दिली उंची ही अनेक आजच्या युवकांना प्रेरणा देणारी आहे. युवक संघटनेच्या माध्यमातून आमदार निलेश लंके यांच्या पाठीमागे त्यांनी मोठी ताकद उभी केली आहे.
Leave a reply