दौंड प्रतिनिधी / किरण थोरात : गेल्या महिन्याभरात दौंड तालुक्यात विविध ठिकाणी चोरी झाल्याचे आढळून आले त्यामध्ये विशेष लक्ष वेधुन घेणारी बाब म्हणजे ड्रोन् कॅमेरा, हा कॅमेरा चोरी होण्याआधी संपूर्ण परिसराचा आढावा घेत असल्याची चर्चा समोर आली आहे, काल रात्री दि.01/06/2024 रोजी संध्याकाळी 9 च्या दरम्यान दौंड तालुक्यातील खामगांव पंचकृषी मध्ये नागरिकांची एकच धावपळ पाहायला मिळाली, सर्वत्र ठिकाणी भीतीचे वातावरण निर्माण झाले होते त्याचं कारणं ड्रोन् कॅमेरा, जवळपास 4 ते 5 कॅमेरे निदर्शनात आले होतें ते जवळपास खामगांव, गाडमोडी, तांबेवाडी, यादववाडी, यवत (सावंत वस्ती) अशा भागात जास्त प्रमाणांत गिरक्या घालताना दिसून आलें त्यानंतर प्रत्येक गावा गावात तरूण मुलांनी ठीक ठिकाणी संपूर्ण रात्रभर पहारा एकत्र राहुन पहारा दिला, खरतर यामध्ये प्रामुख्याने पोलिसांनी लक्ष घालावं अशी नागरिकांची मागणी होत आहे,
“जगासोबत चोर देखिल झाले अपडेटेड, सुशिक्षित चोर असल्याची चर्चा समोर येत आहेत,
पोलिसांकडून लवकरच काही ठोस भूमिका घेतली गेली पाहिजे कारणं नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले पाहायला मिळतं आहे आणि या प्रकरणाचा तपास आजुन कोणत्या ठिकाणी नविन चोरी होण्याआधी व्हावा अशी विनंती आहे. अनिकेत कोळपे
युवा नेते (खामगांव)
“दौंड तालुक्यात लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालाची चर्चा मागे तर ड्रोन् कॅमेऱ्याच्या चर्चांना उधाण” “खामगांव पंचकृषी मध्ये रात्री ड्रोन् कॅमेरे सुसाट “

0Share
Leave a reply