राहुरी प्रतिनिधी / जावेद शेख : वरवंडी ता राहुरी येथे ३१ मे २०२४ रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९९ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली सकाळी ९ते ११ आहिल्यादेविंच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले या वेळी श्री सुभाषराव गायकवाड योसेफ भालेराव सर पत्रकार आर आर जाधव यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याबद्दल मनोगते व्यक्त केली
सायंकाळी ७ ते ९ विदयुत रोषणाई च्या रथातून फटाक्यांच्या आतीश बाजीत सवाद्य गावातून भव्य मिरवणुक काढण्यात आली मिरवणुकीत वरवंडीतील ग्रामस्थांनी मा उपसरपंच दिलीप थोरात रामभाऊ शिंगाडे रामा गर्दै पोपट माने विष्णु शिंगाडे आदींच्या समुहानी जागोजागी गजीनृत्याचे उत्कृष्ट प्रदर्शन केले व त्यानंतर रात्री महाप्रसादाचा कार्यक्रम झाला.
हा जयंती उत्सव पार पाडणे साठी नितीन बरे कोंडीराम बाचकर राधाकृष्ण बरे संदिप बाचकर व त्यांच्या संयोजक समुहाने अथक परिश्रम घेतले या प्रसंगी मोरया समुहाचे गोरख अडसुरे वरवंडी सरपंच भाऊसाहेब कोळेकर ग्राप सदस्य बंटी अडसुरे मा उपसरपंच भास्कर काळे शरद ढगे पैलवान दत्तु अडसुरे राजु बर्डे दिपक बर्डे संतोष थोरात गोरख कदम गौतम शिंदे आण्णा गर्दै रामनाथ कोळेकर संभाजी गर्दै अक्षय पवार आदीसह बहुसंखेने ग्रामस्थ सहभागी झाले होते या कार्यक्रमात महीलांची उपस्थिती लक्षणीय होती
Leave a reply