Disha Shakti

इतर

वाडिया पार्कच्या जलतरण तलावात पोहत असताना एका व्यक्तीचा बुडून मृत्यू

Spread the love

नगर प्रतिनिधी / जितू शिंदे : नगर येथील वाडिया पार्कमधील जलतरण तलावात पोहत असताना एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. सागर प्रकाश कळसकर (वय 43 रा. तापीदास गल्ली, गंजबाजार, नगर) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.

याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सागर कळसकर हे रविवारी सकाळी वाडिया पार्कमधील जलतरण तलावात पोहण्यासाठी गेले होते. ते पोहण्यासाठी तलावात उतरले. बराचवेळ झाला तरी ते वरती न आल्याने पोहण्यासाठी आलेल्या इतर व्यक्तींच्या हा प्रकार लक्ष्यात आला. त्यांना पाण्याच्या बाहेर काढून त्यांचे नातेवाईक राजेंद्र दिगंबर कळसकर यांनी उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासले असता ते मयत झाल्याचे घोषीत केले.

याबाबतची माहिती रूग्णालयातील डॉक्टरांनी कोतवाली पोलिसांना दिली. पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान सागर हे पोहण्यासाठी तलावात उतरल्यानंतर त्यांना चक्कर आल्यामुळे किंवा पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच सागर यांच्या मृत्यूचे कारण समोर येईल असे पोलिसांनी सांगितले. पोलीस अधिक तपास करत आहेत.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!