अ.नगर प्रतिनिधी / वसंत रांधवण : देशभरात लोकसभा निवडणुकीचा केंद्रबिंदू मानल्या जाणाऱ्या अहमदनगर मतदार संघात भाजपला मोठा धक्का बसला आहे. अहमदनगर मतदार संघात पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक दिग्गज नेत्यांनी प्रतिष्ठापणाला लावली होती. मात्र या जागेवर भाजपला मोठा पराभवाचा धक्का बसला आहे.
राज्याचे लक्ष लागलेल्या अहमदनगर मतदार संघात महाविकास आघाडीकडून निलेश ज्ञानदेव लंके हे उमेदवार म्हणून उभे राहिले होते, तर भाजपकडून डॉ.सुजय विखे पाटील हे रणांगणात उतरलेले होते. मात्र आता भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. डॉ.सुजय विखे पाटील हे विद्यमान खासदार देखील होते. त्यांच्या या पराभवामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. निलेश लंके यांनी मोठी लीड घेऊन विजयचा गुलाल उधळला आहे. त्यामुळे भाजप पक्षाची या ठिकाणी ताकद कमी पडल्याचं दिसत आहे.
शरद पवार गटाकडून उभे राहिलेल्या निलेश लंके यांनी सुजय विखे पाटील यांचा 29 हजार 317 मतांनी पराभव केला आहे. सकाळी मतमोजणीला सुरूवात झाल्यापासूनच निलेश लंके आणि सुजय विखे-पाटील यांच्याच अटीतटीची लढाई सुरू होती. निलेश लंके आघाडीवर तर कधी सुजय विखे पाटील आघाडीवर जात होते अखेर लंके यांनी गुलाल उधळला.
अहमदनगरमध्ये भाजपला मोठा धक्का, डॉ.सुजय विखे पाटील यांचा पराभव ; निलेश लंके ठरले जायंट किलर

0Share
Leave a reply