Disha Shakti

राजकीय

मोदी सरकार नव्हे तर, NDA सरकार; बहुमताला हुलकावणी मिळताच मोदींची भाषा बदलली

Spread the love

दिशाशक्ती न्यूजनेटवर्क :  काल देशात लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहे. या निवडणुकीत सत्ताधारी भाजपला मोठा झटका बसला आहे. भाजपला या निवडणुकीत स्वबळावर बहुमत मिळताना दिसत नाही. तर दुसरीकडे इंडिया आघाडीने 230 पेक्षा जास्त जागा जिंकल्याने देशात एनडीए की इंडिया आघाडी कोण सरकार स्थापन करणार याकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे.

आतापर्यंत समोर आलेल्या निकालात एनडीएला 290 जागा मिळाले आहे मात्र भाजपला स्वबळावर बहुमत मिळाला नसल्याने बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू यांच्या निर्णयावर भाजपला अवलंबून राहावे लागणार आहे. यामुळे आज कार्यकर्त्यांशी बोलताना नरेंद्र मोदींनी  कुठेही मोदी सरकारचा उल्लेख न करता एनडीए सरकार पुन्हा एकदा देशात सरकार बनवणार अशी घोषणा केली.

लोकसभा निवडणुकीत प्रचार करताना मोदीच्या नावाने मत करा असा प्रचार भाजपकडून करण्यात येत होता मात्र आता निकाल जाहीर झाला असून भाजपला बहुमत न मिळाल्याने मोदींकडून एनडीए सरकारचा उल्लेख होताना दिसत आहे. तसेच या भाषणात नरेंद्र मोदींकडून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या देखील उल्लेख करण्यात आला. मोदी म्हणाले, बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या नेतूत्वात एनडीए सरकार चांगली कामगिरी करत आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.

या भाषणात नरेंद्र मोदी म्हणाले, जनतेने तिसऱ्यांदा एनडीएवर विश्वास व्यक्त केला असून,नव्या उर्जेने, उत्साहाने आणि निर्धाराने आम्ही पुढे जाऊ, देशाच्या इतिहासात हा अभूतपूर्व क्षण आहे. मी या प्रेमासाठी माझ्या कुटुंबियांना प्रणाम करतो असं मोदी म्हणाले. देशाने एनडीएवर विश्वास दाखवला आहे. आजचा हा विजय जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा विजय आहे असं देखील मोदी म्हणाले.

या भाषणात नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, मी आज निवडणूक आयोगाचा देखील आभार मानतो, त्यांनी जगातील सर्वात मोठी निवडणूक संपन्न केली. निवडणूक आयोगाच्या प्रक्रिया आणि यंत्रणांवर प्रत्येक भारतीयाला गर्व आहे. आपल्या देशात 1962 च्या नंतर पहिल्यांदा एक सरकार असं आलं आहे जे तिसऱ्यांदा परतलं आहे. जिथे आज विधानसभा निवडणूक झाली तिथेही एनडीएला भव्य विजय मिळाला.

अरुणाचल प्रदेश, आंध्र प्रदेश किंवा सिक्कीम असो या राज्यांमध्ये काँग्रेसचा सूपडा साफ झाला आहे. ओडिशामध्ये भाजप पहिल्यांदाच सरकार स्थानप करणार आहे. केरळमध्येही आज आपलं खासदार निवडून आला आहे तसेच तेलंगणामध्ये आपली संख्या डबल डिजिट झाली आहे.

हिमाचल, छत्तीसगढ, मध्य प्रदेश, गुजरात, दिल्ली, उत्तराखंडमध्ये आपल्या पक्षाने क्लिन स्वीप केलं आहे. मी या सगळ्या राज्यांचेही आभार मानतो असंही यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!