दौंड प्रतिनिधी / सुधीर लोखंडे : दौंड तालुक्यातील खानवटे या गावांमध्ये चोरट्यांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट पहावयास मिळत आहे, गेल्याच आठवड्यात खानवटे गावामध्ये श्री राहुल शेळके हे दांपत्य उष्णतेमुळे घराबाहेर झोपले होते मध्यरात्री एक ते चार या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या अंगावर स्प्रे मारून घरातील रोख रक्कम व डाग दागिने असा ऐवज चोरून नेला व घरातील कागदपत्रे रस्त्यावर इतरत्र फेकून देण्यात आली, गावामध्ये व आसपासच्या परिसरामध्ये मध्यरात्री ड्रोनच्या साह्याने अज्ञात चोरटे टेहाळणी करून चोरी करत आहे, यामध्ये खानवटे, भिगवन, भिगवन स्टेशन, राजेगाव, डिकसळ, तक्रारवाडी, मदनवाडी इत्यादी गावांमध्ये रात्री अप रात्री ड्रोन च्या साह्याने टेहाळणी करून लोकांमध्ये घाबरट पसरण्याचे काम करत आहे तरी संबंधित पोलीस अधीक्षकांनी यामध्ये लक्ष घालून अज्ञात चोरट्यांना पकडण्यात यावे अशी अशी मागणी गावातील ग्रामस्थांनी केली आहे. व गावातील लोकांचे समुपदेश करून भीती दूर करण्यात यावी.
आसपासच्या परिसरामध्ये लोकसभेच्या बातमीपेक्षा ड्रोनची चर्चा जास्त प्रमाणात चालू असल्याचे निदर्शनात येत आहे. तरी या चोरट्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी तीव्र मागणी ग्रामस्थांनी केली आहे, पोलिसांप्रती ग्रामस्थांनी तीव्र नापसंती व्यक्त केले आहे, त्यांचा योग्य तो छडा लावावा अन्यथा तीव्र असे आंदोलन केले जाईल असे आसपासच्या परिसरातील ग्रामस्थांनी सांगितले.
दौंड तालुक्यातील खानवटे गावामध्ये चोरट्यांचा सुळसुळाट ; ड्रोनच्या साह्याने टेहाळणी होत असलच्या चर्चेनां उधाण

0Share
Leave a reply