श्रीरामपूर विशेष / इनायत अत्तार : श्रीरामपूर तालुक्यातील नाऊर येथील प्रा.गणेश सुभाष शिंदे यांना नुकतीच डॉक्टरेट पी.एच.डी. डिग्री इन मॅनेजमेंट मध्ये श्री जेजेटी विद्यापीठ, राजस्थान यांच्याकडून प्रदान करण्यात आली आहॆ. त्यांना पी.एच.डी. डिग्री प्राप्त करण्यासाठी मार्गदर्शक म्हणून डॉ. क्रितिका सिंग व डॉ. आर. एच. जाजू यांचे मार्गदर्शन लाभले.
प्रा. गणेश सुभाष शिंदे हे सध्या डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणे येथे सहाय्यक प्राध्यापक या पदावर कार्यरत असून त्यांच्या या यशाबद्दल डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या विश्वस्त आणि सचिव तथा प्रति कुलगुरू मा. डॉ.स्मितादेवी जाधव मॅडम, सेन्टर फॉर ऑनलाईनच्या डायरेक्टर डॉ. साफिया फारुकी मॅडम, वरिष्ठ सल्लागार डॉ.बी.व्ही. मराठे सर व संपूर्ण डी.पी.यु.परिवार यांच्याकडून त्यांचं अभिनंदन करण्यात आलं.
नाऊर, येथील सामाजिक कार्यकर्ते स्व. सुभाषदादा शिंदे यांचे ते पुत्र आहेत. पीएच.डी दरम्यान त्यांनी ०३ संशोधन लेख विविध आंतरराष्ट्रीय स्कॉपस (Scopus Indexed ) इंडेक्सएड जर्नल मध्ये प्रकाशित केले आहेत व ०१ भारतीय पेटंट सुद्धा फाइल्ड करून प्रकाशित त्यांनी केले आहे, तसेच ०२ आंतरराष्ट्रीय परिषद आणि ०२ राष्ट्रीय परिषदेत भाग घेतला आहे. या यशाचं सर्व श्रेय त्यांनी , त्यांच्या आई वडिलांना, अर्धांगिनीला, मुलांना व कुटूंबाला, तसेच त्यांना घडवणाऱ्या गुरूंना, शिक्षकांना, सर्व मार्गदर्शकांना जाते असे त्यांनी सांगितले. प्राध्यापक गणेश सुभाष शिंदे यांचे नाऊर ग्रामस्थांकडून व परिसरातील नागरिकांनी कौतुक करत शुभेच्छा वर्षाव केला
श्री.जेजेटी विद्यापीठ, राजस्थान यांच्याकडून प्रा.गणेश सुभाष शिंदे यांना पीएच.डी प्रदान

0Share
Leave a reply