राहुरी प्रतिनिधी /ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी तालुक्यातील महसूल व पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाने वाळू व गौण खनिजाची तस्करी मोठ्या प्रमाणात सुरु आहे. गौण खनिज तस्करी करणार्या एका डंंपरने रविवार दि.9 जून रोजी सकाळच्या दरम्यान एका दुचाकीस्वारास धडक देऊन चिरडले. या अपघातात मोटारसायकलस्वार जागीच ठार झाल्याची माहिती मिळाली आहे.
रविवारी सकाळी 11.45 वाजे दरम्यान डंपर (एमएच 16 सी सी 7326) या कचखडीने भरलेल्या डंपरने महात्मा फुले कृषी विद्यापीठ परिसरात डाव्या कालव्याजवळ फार्म कॉर्टर समोर नगर-मनमाड राज्य महामार्गावर दुचाकी क्र. एम. एच. 16 सी. पी. 3180 या मोटारसायकल ला पाठीमागुन जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार सुरेश सुभाष साळूंके (रा. नालेगाव, नगर) हा तरुण डंपरच्या चाकाखाली चिरडल्याने तो जागीच ठार झाला. त्यावेळी डंपर चालक डंपर घेऊन घटनास्थळावरून पसार झाला. आणि एका ठिकाणी कचखडी खाली करुन पसार होण्याचा प्रयत्न करत होता.
काही स्थानिक नागरीकांनी सदर डंपर पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला. रविवार सुट्टी असताना सदर डंपर कोठे भरला? कोठे चालला होता? डंपरमधील कचखडीची रॉयल्टी भरली होती का? अपघाता नंतर सदर डंपरमधील कचखडी कोणाच्या घरासमोर खाली केली? या बाबत महसूल व पोलिस प्रशासनाने सविस्तर चौकशी करावी. तसेच या अपघातास दोषी असलेल्या सर्वांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी केली आहे.
कृषी विद्यापीठ परिसरातील डाव्या कालव्याजवळ डंपरच्या धडकेत नगरच्या तरूणाचा जागीच मृत्यू

0Share
Leave a reply