विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : नेवासा तालुक्यातील शिंगवे तुकाई शिवारात ट्रॅव्हल व ट्रेलरची धडक झाली. सुदैवाने यात कुठलीही जिवित हानी झाली नाही. पोलीस सुत्रांकडून समजलेल्या माहिती नुसार 11 जुन रोजी पहाटे 3 वाजेच्या सुमारास शिंगवे तुकाई शिवारातील पारस कंपनी समोर ट्रॅव्हल बस (एमएच 23 एयू 5500) व ट्रेलर (एमएच 40 बीजी 2801) ही दोन्ही वाहने संभाजीनगर मार्गे नगरकडे जात असताना बस चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत आपल्या समोरच नग कडे जाणार्या ट्रेलरला मागील बाजूस जोराची धडक दिल्याने दोनही वाहनांचे मोठे नुकसान झाले.
या प्रकरणी परसराम तुकाराम डोळे (वय 36) रा. पांगरा डोके ता. लोणार जि. बुलढाणा यांनी बस चालक खंडुराम कैलास दौड (वय 48) रा. सिल्क कॉलनी रेल्वे स्टेशन जवळ छत्रपती संभाजीनगर याचे विरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा र नं. 255/2024 भारतीय दंड विधान द.वि.कलम 279,337,338,427 सह मो. वा. कायदा 184 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास हवालदार ए. एच. तमनर हे करत आहेत.
Leave a reply