राहता प्रतिनिधी / विट्ठल ठोंबरे : डॉ. सुजयदादा विखे पाटील मित्र मंडळ नांदूर व ग्रामपंचायत नांदूर यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन नांदूर ग्रामपंचायत येथे करण्यात आले असून सर्व ग्रामस्थांनी व मित्र मंडळ, संघटना यांनी मोठ्या संख्येने रक्तदान शिबिरामध्ये उपस्थित रहावे.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मा.ना.राधाकृष्ण विखे पाटील (मंत्री, महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास, महाराष्ट्र राज्य )यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात नांदूर येथे साजरा करण्यात येणार आहे. तरी सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ, मित्र मंडळ यांनी मोठ्या संख्येने साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित रहावे. “रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान’ चला तर मग एकजुटीने रक्त दान करूया!एका सामान्य व्यक्ती बरोबर गरजू व्यक्तीचे प्राण वाचविण्यासाठी एक पाऊल पुढे येऊया.
“रक्त दान,हेच जिवन” सार्थ करूया.
राहाता तालुक्यातील नांदूर येथे ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन…

0Share
Leave a reply