सोनई प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : सोनई पोलीस स्टेशन हद्दीतील माका गावचे रहिवाशी नामे श्री सुदाम गिरीधर पालवे यांनी दिनांक 05/06/2024 रोजी फिर्याद दिली की, दिनांक 27/05/2024 रोजी 19/00 ते दिनांक 28/05/2024 रोजीचे 05/30 दरम्यान त्यांचे माका गावचे शिवारातील शेती गट नं. 430/3/अ मधिल उघड्या शेडमध्ये ठेवलेल्या दोन इलेक्ट्रीक मोटारी, 5 एच.पी.चे सबमर्शिबल इलेक्ट्रीक पंप, ग्रियुज लॉम्बॉडींग कंपनीचे 5 एच.पी.चे मशीन व ओनिडा कंपनीची 250 फुट लांबीची फुट लांबीची केबल ही त्यांना दिसली नाही. त्यावरुन त्यांनी व त्यांचे कुटुंबीयांनी मिळुन नमुद शेती अवजारांचा आजुबाजुच्या परिसरात शोध घेतला असता ते मिळुन आले नाहीत. त्यावरुन त्यांची खात्री झाली की, कोणीतरी अज्ञात चोरट्याने वरील नमुद शेती अवजारे हे त्याचे आर्थीक फायद्याकरीता चोरून नेले आहे. वगैरे म/चे फिर्यादीवरुन सोनई पोलीस स्टेशन येथे गुरनं 250/2024 भादंवि कलम 379 प्रमाणे गुन्हा नोंद झाला व गुन्ह्याचा पुढिल तपास पोहेकों आप्पासाहेब तमनर यांचेकडे देण्यात आला होता.
तपासादरम्यान गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवुन मा. पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला साहेब, मा.अपर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलुबर्मे साहेब व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुनिल पाटील साहेब यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली आम्ही सहा. पोलीस निरीक्षक आशिष प. शेळके यांनी गुन्ह्याचे तपासकामी व आरोपी शोध कामी सोनई पोलीस स्टाफचे वेगवेगळे तपास पथके तयार करुन तसेच गोपनीय बातमीदार व तांत्रीक माहितीचे आधारे संशयीत इसम नामे 1) संपत उर्फ संदिप दादाभाऊ सांगळे, वय 27 वर्ष, 2) ऋषिकेश भाऊसाहेब केकाण, वय 18 वर्ष दोघे रा. महालक्ष्मी हिवरे ता. नेवासा जिल्हा अ.नगर यांना ताब्यात घेवुन विश्वासात घेवुन त्यांचेकडे कौशल्यपुर्वक सखोल तपास केला असता त्यांनी नमुद गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यांना दिनांक 11/06/204 रोजी 23/57 वा. अटक केले. दरम्यान आरोपी नामे संपत उर्फ संदिप दादाभाऊ सांगळे याचेकडुन नमुद गुन्ह्यातील गेला मालापैकी खालील नमुद मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
1) 10,000/- रू. च्या 5 HP च्या 2 इलेक्ट्रीक मोटार जु.वा. किं. अं.,
2) 10,000/- रू. चे ग्रियुज लॉम्बॉडींग कंपनीचे 5 HP चे मशीन जु.वा. किं.अं.,
3) 5,000/- रू. चे 5 HP चे सवमशिवल इलेक्ट्रीक पंप जु.वा. किं.अं. 25,000/- रु येणे प्रमाणे असे
तरी पोहेकॉ 1710 आप्पासाहेब तमनर हे गुन्ह्याचा पुढिल तपास करीत असुन सदरची कामगीरी ही मा.पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला साहेब, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलुबमें साहेब व मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुनिल पाटील साहेब यांचे मार्गदर्शनाखाली सोनई पोलीस स्टेशनचे आम्ही सहा. पोलीस निरीक्षक आशिष प. शेळके, पोलीस उपनिरीक्षक सुरज पां. मेढे, पोहेकॉ आप्पासाहेब तमनर, पोना/ नानासाहेब तुपे, पोकों/ ज्ञानेश्वर आघाव, पोकों रविकांत गर्जे, पोकों / मृत्युंजय ज्ञानदेव मोरे, पोकों/ निखील तमनर, तसेच उत्तर मोबाईलसेल श्रीरामपुर विभागाचे पोना / सचिन धनाड, पोना / संतोष दरेकर, पोना/ रामेश्वर वेताळ यांनी केली आहे.
ईलेक्ट्रीक पंप व जनरेटर चोरीतील आरोपी सोनई पोलीसांकडुन जेरबंद करुन 24 तासांत मुद्देमाल हस्तगत

0Share
Leave a reply