इंदापूर प्रतिनिधी / प्रविण वाघमोडे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित कळस शाखेचे स्थलांतर व भिगवण शाखेचे नूतनीकरण समारंभ रविवार दिनांक 16 जून 2024 रोजी स. 9:30 वाजता कळस तर 10:30 वाजता भिगवण येथे माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. कार्यक्रमासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ.दिगंबर दुर्गाडे तर उपाध्यक्ष सुनील चांदेरे व व संचालक पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक आप्पासाहेब जगदाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अनिरुद्ध देसाई उपस्थित राहणार आहे.
शेतकरी व सर्वसामान्यांची बँक म्हणून ओळख असलेली पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकच्या या समारंभासाठी भिगवण व कळस परिसरातील नागरिक व ग्रामस्थ यांच्या उपस्थित हा समारंभ सोहळा पार पडणार आहे.
१६ जून रोजी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कळस शाखेचे स्थलांतर तर भिगवण शाखेचे नूतनीकरण

0Share
Leave a reply