इंदापूर प्रतिनिधी/ सुधीर लोखंडे : दि.१६. कै.नामदेव (नाना) नरहरी भोसले यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ खानवटे गावामध्ये वृक्षारोपण करण्यात आले यावेळी उपस्थित श्री राजेंद्र भोसले व संदीप भोसले या दोन बंधूंनी खानवटे गावामध्ये नानांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ वृक्षारोपण केले व दरवर्षी नानांच्या पुण्यस्मरणार्थ वृक्षारोपण करण्याचा संकल्प केला. नानांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ ह भ प संतोष महाराज गाडेकर यांचे फुलांचे असे मंत्रमुक्त करणारे कीर्तन झाले.
नाना हे आसपासच्या पंचक्रोशीत नाना नावाने प्रसिद्ध होते ते वारकरी संप्रदायाचे कार्य करायचे. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले , एक मुलगी व सुना, नातवंडे असा परिवार आहे. फुलांच्या कीर्तनानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
कै. नामदेव (नाना) नरहरी भोसले यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ खानवटे गावामध्ये वृक्षारोपण

0Share
Leave a reply