Disha Shakti

इतर

संगमनेर तालुक्यातील मेंढवण येथे  शेततळ्यात बुडून तीन मुलींचा दुर्दैवी मृत्यू मेंढवण गावावर शोककळा

Spread the love

  • विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : संगमनेर तालुक्यातील मेंढवण येथे  शेततळ्यात बुडून तीन मुलींचा दुर्दैवी मृत्यू मेंढवण येथे ही दुर्दैवी घटना घडली आहे. सदर घटनेमुळे नागरिक हळद व्यक्त करत आहेत. सविस्तर बातमी अशी की संगमनेर तालुक्यातील मेंढवण येथील तीन मुली या खेळण्यासाठी गेल्या असता त्यांचा शेततळ्यात बुडाल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.1)अनुष्का सोमनाथ बडे (वय – ११), 2)सृष्टी उत्तम डापसे (वय – १३),3) वैष्णवी अरुण जाधव (वय – १२), या शनिवार दि.15 जुन रोजी दुपारी शाळेतून घरी आल्या होत्या.त्यानंतर जेवण करून त्या सोमनाथ बढे यांच्या शेताकडे खेळण्यासाठी गेल्या. यावेळी अर्धवट सुरू शेततळ्यात पावसाचे पाणी साचले होते. मुली ह्या पाण्यात खेळण्यासाठी गेल्या असता खोलगट असलेल्या भागाचा अंदाज न आल्याने तिघींचा बुडून मृत्यू झाला.त्यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

दरम्यान माहिती मिळताच पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांनी सहकार्यासह घटस्थळी धाव घेतली. तर याबाबत संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!