राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : गुप्त खबर्या मार्फत मिळालेल्या माहितीनुसार राहुरी पोलीस पथकाने दि. 14 जून रोजी दुपारच्या दरम्यान राहुरी शहरातील तनपुरे खळवाडी येथे सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. यावेळी आठ जुगार्यांना ताब्यात घेऊन कारवाई करण्यात आली आहे. राहुरी पोलिस ठाण्यातील सहायक पो. नि. स्वप्नील पिंगळे यांना गुप्त खबर्या मार्फत जुगार अड्ड्याची माहिती मिळाली.
त्यानुसार राहुरी पोलिस पथकाने दि. 14 जून रोजी दुपारी दोन वाजे दरम्यान शहरातील तनपुरे खळवाडी येथील दिंगबर तनपुरे यांच्या लाकडाच्या वखारीत सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. त्यावेळी तेथे काही इसम पैशावर तिरट नावाचा जुगार खेळत असताना दिसून आले. पथकाने त्यांना जागीच ताब्यात घेऊन त्यांच्याकडून हजारो रुपयांची रोख रक्कम व जुगार खेळण्याचे साहित्य जप्त केले.
पोलिस शिपाई जयदीप शिवनाथ बडे यांच्या फिर्यादीवरून महेश दत्तात्रय वाघ (वय 35), श्रीराम ज्ञानदेव गोरे ( वय 36) रा. बारागाव नांदूर रोड, अन्सार इब्राईम पठाण (वय 50) रा. स्टेशन रोड, बन्सी दगडू विखे (वय 76) रा. खळवाडी, लक्ष्मण चंद्रभान लोव्हाळे, (वय 39) रा. बारागावनांदूर, विशाल गंगाधर मकासरे (वय 38), रा. मुलनमाथा, अविनाश एकनाथ त्रिभुवन (वय 29) रा. मुलनमाथा, दिंगबर तुळसिराम तनपुरे (वय 73) रा. डावखर खळवाडी. या आठ जणांवर गु.र.नं. 708/2024 भादंवि कलम महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम, 1887 चे कलम 12 अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
Leave a reply