Disha Shakti

इतर

पोकलेनच्या बकेटची पीन उडून डोक्यात लागल्याने सडे येथील शासकीय ठेकेदार संदीप पानसंबळ यांचा दुर्दैवी मृत्यू

Spread the love

राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : पोकलेन मशिनचे दुरूस्तीचे काम सुरू असताना मशिनचा चेनलॉक तुटून पोकलेन मशिनच्या बकेटची पीन उडून डोक्यात लागल्याने राहुरी तालुक्यातील सडे येथील शासकीय ठेकेदार संदीप संभाजीराव पानसंबळ (वय 46) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना राहुरी तालुक्यातील वनविभागाच्या डिग्रस नर्सरीत काम चालू असताना घडली.

याबाबत समजलेली माहिती अशी, राहुरी तालुक्यातील वनविभागाच्या डिग्रस नर्सरीत पोकलेन मशिनने खोदकाम सुरू असताना बिघाड झाल्याने त्याची दुरूस्ती सुरू असताना अचानक चेनलॉक तुटला. चेनलॉक तुटल्यानंतर त्या मशिनच्या बकेटला असलेली एक अवजड पीन उडून जवळपास 20 फूट अंतरावर फोनवर बोलत असलेले मशिनचे मालक संदीप पानसंबळ यांच्या डोक्यात लागली. त्यानंतर रक्तबंबाळ अवस्थेत संदीप पानसंबळ यांना तात्काळ नगर येथे उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय आधिकार्‍यांनी त्यांना उपचारापूर्वीच मयत घोषित केले.

या घटनेची माहिती समजताच माजी राज्यमंत्री आ. प्राजक्त तनपुरे यांनी तात्काळ नगर येथे रूग्णालयात धाव घेतली. शवविच्छेदनानंतर काल सायंकाळी संदीप पानसंबळ यांच्या पार्थिवावर सडे येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. ते राहुरी खरेदी-विक्री संघाचे उपाध्यक्ष संतोष पानसंबळ यांचे बंधू होत.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!