Disha Shakti

इतर

पाटोदा येथे विजेचा शॉक लागून म्हैस दगावली, आर्थिक मदत देण्यात यावी शेतकऱ्यांची मागणी

Spread the love

नांदेड जिल्हा प्रतिनिधी /मिलिंद बच्छाव : नायगांव तालुक्यातील पाटोदा गावठाण शेजारील दिलीपराव धर्माधिकारी यांच्या शेतात म्हैस रोजच्या प्रमाणे चारवण्यासाठी सोडली आसता. अचानक रोहित्राच्या तनाव्यात विजेचा प्रवाह उतरल्याने त्याचा म्हशीला स्पर्श झाल्याने म्हशींचा जागीच मृत्यू झाला. ही घाटना बुधवार दि.१५ जून २०१४ रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास घडली.

सदर घटनेची माहिती कळताच बरबडा येथील पशूवैद्यकीय दवाखान्याचे पशूवैद्यकीय अधिकारी डॉ.भालेराव हे घटनास्थळी जाऊन पंचनामा केला तर महावितरण कंपनीचे इंजिनियर जाधव यांनीही घटनास्थळी जाऊन सदर घटनेची पाहणी करून सदरचा अवहाल माझ्या वरिष्ठांकडे कळवणार असल्याचे तोंडी सांगितले असून बरबडा येथील रहिवासी असलेले शेतकरी रामराव मारोती शिंदे हा अल्पभूधारक शेतकरी असल्यामुळे पन्नास ते साठ हजारांची म्हैस वीजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला असल्यामुळे शिंदे या शेतकऱ्यांवर मोठे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे संबंधित विभागाने अल्पभूधारक शेतकरी रामराव शिंदे यांना तात्काळ आर्थिक मदत घ्यावी अशी मागणी करत आहेत


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!