दिशाशक्ती पुणे : इंदापूर तालुक्यातील खानवटे येथील पत्रकार सुधीर शशिकला प्रभाकर लोखंडे यांना पत्रकारिता क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल राहुरी विद्यापीठ येथे आठ जून रोजी विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यावेळी त्यांनी या पुरस्कारामागे आपले आई-वडील पत्नी नातेवाईक व मित्रमंडळी यांचे पाठबळ असल्याचे सांगितले व दिशाशक्ती मीडियाचे मनःपूर्वक आभार मानले.
या पुरस्काराने दिशाशक्ती मीडिया समूहाने पत्रकारिता क्षेत्रात विशेष बळ व उल्लेखनीय कार्य करण्यास शक्ती मिळेल हा पुरस्कार मिळाल्याने दिशाशक्ती समूहाने माझ्या पाठीवर कौतुकाची छाप टाकली आहे, मी त्यांचा सदैव ऋणी राहील. हा पुरस्कार सुधीर लोखंडे यांना त्यांनी पत्रकारिता सामाजिक व इतर क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल तसेच लोकशाही मार्गाने कामगिरी करून आपले बुद्धी कौशल्य व भारतीय राज्यघटनेतील लोकशाही समाजवादी धर्मनिरपेक्ष जनसेवा राष्ट्र हे जोपासून सामाजिक समता ब्लॉक करून आपल्या गावाचे जिल्ह्याचे नाव उज्वल केले व सत्याची कास धरून एक सामान्य पत्रकारिता समाज उपयोगी राबणारा पत्रकार अशी ओळख निर्माण केली आहॆ.
Leave a reply