Disha Shakti

क्राईम

शनिशिंगणापूरचा गव्हाणे खून करून पसार झाला, टप्प्यात येताच स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या

Spread the love

अ.नगर प्रतिनिधी / वसंत रांधवण : नवनागापूर, एमआयडीसीत तरुणाचा खून करणार्‍या संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शनिशिंगणापूर (ता. नेवासा) येथून ताब्यात घेत अटक केली आहे. किरण बाळासाहेब गव्हाणे (वय 26, रा. शनिशिंगणापूर) असे त्याचे नाव आहे. अविनाश मिरपगार (रा. नवनागापूर) हे आंधळे चौक, नवनागापूर येथे उभे राहून फोनवरून पत्नीला व्हिडीओ कॉल करून बोलत होते. दरम्यान, त्याठिकाणी असलेल्या पाच जणांनी अविनाश हा व्हिडीओ काढत असल्याच्या संशयावरून त्यास शिवीगाळ करत मारहाण केली व सिमेंट ब्लॉक डोक्यात घालून त्याचा खून केला होता.

याप्रकरणी अविनाशची पत्नी काजल स्टीफन मिरपगार (वय 28, रा. नवनागापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून संशयित आरोपी किरण गव्हाणे पसार होता. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक तुषार धाकराव, अंमलदार दत्तात्रय गव्हाणे, रवींद्र कर्डिले, ज्ञानेश्वर शिंदे, संदीप दरदंले, देवेंद्र शेलार, फुरकान शेख व मेघराज कोल्हे यांचे पथक गव्हाणेचा शोध घेत होते.

तांत्रिक विश्लेषणाच्याआधारे शोध घेत असताना गव्हाणे त्याच्या राहत्या घरी आला असल्याची माहिती मिळाली. पथकाने गव्हाणेच्या वास्तव्याबाबत माहिती घेऊन त्याला शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारणा केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली.त्याला पुढील तपासकामी एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!